Pune Lok Sabha-Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी एकदिलाने मैदानात : बाळा नांदगावकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha-Murlidhar Mohol | पुणेकर मतदार विशेषतः युवक राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात एकदिलाने उतरले आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.(Pune Lok Sabha-Murlidhar Mohol)

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची पहिली सभा भाजपा नेते नारायण राणे यांच्यासाठी कोकणात झाली होती. आता दुसरी सभा महायुतीचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात होत आहे. ही सभा उद्या १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

सभेची माहिती देताना बाळा नांदगावकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुण्यातील
सारसबाग परिसरात उद्या सायंकाळी ६ वाजता होणार आहे. सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजप आणि
मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले.

बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत.
सभेला चांगली गर्दी होईल असा विश्वास आहे. सभास्थानी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली आणि आढावा घेतला.
वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Chandrakant Patil | अजितदादा स्पष्टच म्हणाले, ”चंद्रकांत पाटील ते चुकीचंच बोलले, आम्ही त्यांना सल्ला दिला …बारामतीत आमचे कायकर्ते पाहुन घेतील”

Pune Crime News | पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनींचे चोरुन व्हिडीओ काढणाऱ्या दोघांवर FIR, विद्यार्थिनीचा समावेश

Kondhwa Pune Crime News | पुणे : गाडीची लाईट डोळ्यावर चमकल्याने 20 जणांच्या टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण (Video)

Murlidhar Mohol | महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची हास्यक्लबला भेट ! नवा भारत घडविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन