Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपडेट ! अभिजीत मानकरला अटक

पुणे : नितीन पाटील – Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ खून प्रकरणाशी संबंधित तब्बल 19 हजार 827 ऑडिओ क्लिपपैकी 10 हजार 500 ऑडिओ क्लिपची चाळणी (तपासल्या) केली असून त्यामध्ये 6 क्लिप या संशयास्पद आढळून आल्या आहेत. त्या 6 क्लिपच्या तपासाअंती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभिजीत अरूण मानकर (31, रा. दत्तवाडी) याला आज (मंगळवार) सायंकाळी अटक केली आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित उर्फ अमर मारूती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारूती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक झाली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेने शरद मोहोळ खून प्रकरणानंतर अवघ्या 24 तासाच्या आत मारेकर्‍यांच्या आणि त्यांच्या कटामध्ये सहभागी असणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे अटकेतील आरोपींची आणि इतर काही जणांची संभाषणे झाली होती. अशा तब्बल 19 हजार 827 क्लिप गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान समोर आली. त्यापैकी पोलिसांनी 10 हजार 500 क्लिप तपासल्या असून त्यापैकी 6 क्लिप या संशयास्पद आढळून आली आहे.

त्याच्या तपासाअंती पोलिसांनी अभिजीत अरूण मानकर याला अटक केली आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि नामदेव महिपती कानगुडे यांच्यातील संभाषणामध्ये अभिजीत मानकरचे नाव समोर आले असून पोलिसांनी अभिजीत मानकरला मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे.

अभिजीत मानकर याच्याकडे तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनील तांबे आणि सहाय्यक आयुक्त सतीश गोवकर यांनी माहिती दिली आहे.

Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Police News | सराईत गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरविणारे व्हाईट कॉलरवाले पुणे पोलिसांच्या ‘रडार’वर
Parliament Budget Session | नारायण राणेंना इंग्रजीत विचारला प्रश्न, दिलं भलतंच उत्तर, अडचणीत आणणारा खासदार भाजपाचाच, पुढे घडलं असं…
Pune Crime News | पिंपरी : किरकोळ कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर FIR
Pune Crime News | पिंपरी : प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून घरातील सामानाची तोडफोड
Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तडीपार गुन्हेगाराला कोयत्यासह अटक