Pune Loni Kalbhor Crime | पुणे : ‘तुझ्यात दम असेल तर जवळ ये’ भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Loni Kalbhor Crime | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिवीगाळ करुन तरुणाला धारदार हत्याराच्या दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच दुसऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार लोणी काळभोर येथे घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सिद्राम मळा येथील नवा कॅनॉलच्या रोडलगत घडला आहे.(Pune Loni Kalbhor Crime)

याबाबत प्रसाद सुरेश काळभोर (वय-23 रा. बाजार मळा, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रशांत तुकाराम काळभोर (वय-25), सुजीत वलटे (वय-30), सुरज पांडुरंग गवते (वय-23), विशाल काळभोर (वय-40 सर्व रा. लोणी काळभोर ता. हवेली) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र हर्षद काळे याला कोळपे वस्ती येथील घरी सोडण्यासाठी
दुचाकीवरुन जात होते. नवा कॅनॉल येथील रोडलगत फिर्यादी यांचा मित्र औदुंबर काळभोर व सुरज गवते यांच्यात भांडण सुरु होते. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी फिर्य़ादी गेले. तुम्ही कशाला वाद करताय अशी विचारणा केली असता आरोपींनी तुला काय करायचे आहे असे म्हणून शिवीगाळ केली.

तसेच ‘तुझ्यात दम असेल तर जवळ येवुन दाखव’ असे म्हणत फिर्यादी यांच्या तोंडावर लोखंडी हत्याराच्या
दांडक्याने मारहाण करुन जखमी केली. त्यावेळी हर्षद याने मध्यस्थी केली असता आरोपींनी त्याला देखील
लाथबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका