Pune Lonikand Crime | अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन बलात्कार, आरोपी पतीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lonikand Crime | अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन तिच्यावर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीची आई, आरोपी पती, सासू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 21 जून 2023 ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत मांजरी खुर्द व पीडित मुलीच्या घरी घडला आहे. (Pune Lonikand Crime)

याबाबत मांजरी खुर्द येथे राहणाऱ्या पीडित 17 वर्षीय मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात रविवारी (दि.18) फिर्याद दिली आहे. यावरुन पती अजय राजु चौगुले (वय-20 रा. मांजरी खुर्द), सासू मनिषा राजु चौगुले (वय-38 रा. मांजरी खुर्द), आई विमल अनिल चव्हाण (वय-42 रा, सहजपुर, उरुळी कांचन) यांच्यावर आयपीसी 376/2/एन, पोक्सो अॅक्ट, बाल विवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिचे लग्न अजय चौगुले याच्यासोबत हिंदू विवाह पद्धतीने लावून दिले.
हे लग्न 21 जून 2023 रोजी पार पडलं होतं. लग्नानंतर आरोपी अजय याने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
यातून मुलगी गर्भवती राहिली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी पती, सासू आणि पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करुन
आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sena Kesari 2024 In Pune | महेंद्र गायकवाड ठरला सेनाकेसरी 2024, पृथ्वीराज मोहोळवर मात करीत कोरले चांदीच्या गदेवर नाव

Pune Wagholi Crime | वाघोली पोलीस चौकीसमोर पटवून घेतलेल्या रोहिदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यु

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, घोषणांनी दुमदुमला परिसर!

Sharad Pawar-Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी