Sena Kesari 2024 In Pune | महेंद्र गायकवाड ठरला सेनाकेसरी 2024, पृथ्वीराज मोहोळवर मात करीत कोरले चांदीच्या गदेवर नाव

पुणे : Sena Kesari 2024 In Pune | महेंद्र गायकवाड हा मानाच्या राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड या मोठ्या कुस्तीपटूंमध्ये ही अत्यंत अटीतटीची स्पर्धा रंगली. महेंद्र गायकवाड याने पृथ्वीराज मोहोळवर चुरशीची एकतर्फी मात देऊन मानाचा ‘सेना केसरी 2024 किताब’ पहिल्यांदाच पटकावला आहे. अत्यंत कडव्या झालेल्या लढतीत गायकवाड याने मोहोळला धूळ चारत बुलेटसह मानाची गदा पटकावली.

हडपसरच्या हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर या स्पर्धा पार पडल्या. राज्यातील जवळपास 600 पैलवानांनी यात सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शिवसेना शहरप्रमुख यांनी या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते,महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने या भव्य स्पर्धा पडल्या.

शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आ.भरतशेठ गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, बाळासाहेब तात्या भानगिरे व मान्यवरांच्या हस्ते पुण्याचा विजयी पैलवान पृथ्वीराज मोहोळ याला पाच लक्ष रोख इनामासह, सेनाकेसरी किताब, सुपर बुलेट गाडी आणि मानाची चांदीची गदा बहाल करण्यात आली. तर सोबतच उपविजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ याला तीन लक्ष रोख, उपसेनाकेसरी किताब देवून गौरविण्यात आले.

महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झालेल्या मातीवरील निकाली कुस्तीत महेंद्रने प्रतिस्पर्धी पृथ्वीराज
या मल्लावर मात करत सेना केसरीचा किताब आपल्या नावावर केला. पृथ्वीराज मोहोळच्या उजव्या पायाला जोरात
झटका बसला तरीही तो मोठ्या जोशात ही कुस्ती खेळला.

यावेळी जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, युवा सेना राज्य सचिव किरण साळी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,
युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, महिला आघाडी शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी,लक्ष्मण आरडे,
सुनिल जाधव, राजाभाऊ भिलारे,संतोष राजपूत, अभिजीत बोराटे, नाना तरवडे,राजेंद्र भानगिरे,अभिमन्यू भानगिरे,
उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, करण भानगिरे, प्रज्वल भानगिरे, आकाश भानगिरे अमर घुले, विकी माने, दिपक कुलाळ,
नितीन लगस व असंख्य शिवसैनिक, कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली पोलीस चौकीसमोर पटवून घेतलेल्या रोहिदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यु

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, घोषणांनी दुमदुमला परिसर!

Sharad Pawar-Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी