Pune Mahavitaran News | थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यास पुनर्जोडणीसाठी शुल्क भरणे आवश्यक; पश्चिम महाराष्ट्रात ४५ हजारांवर थकीत जोडण्यांची वीज खंडित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Mahavitaran News | थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम व नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल ४४ हजार ९७२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दैनंदिन आयुष्यात वीज ही अत्यंत आवश्यक झालेली आहे. मात्र वीज वापरल्यानंतर बिलांचा नियमित भरणा होत नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १४ लाख १६ हजार ३०० ग्राहकांकडे २५४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- १६५ कोटी १४ लाख रुपये (७,३०,८५०), सातारा- १५ कोटी ३४ लाख (१,४२,९००), सोलापूर- ३१ कोटी ९४ लाख (१,९६,९१५), कोल्हापूर- २३ कोटी ९२ लाख (१,८२,५२०) आणि सांगली जिल्ह्यात १७ कोटी ८५ लाख रुपयांची (१,६३,०५०) थकबाकी आहे.(Pune Mahavitaran News)

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा जोडून घेण्यासाठी थकबाकीच्या रकमेसोबतच नियमानुसार ग्राहकांनी पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी भरणे आवश्यक आहे. यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुनर्जोडणी शुल्क निश्चित केले आहे. यामध्ये लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी २१० रूपये व थ्री फेजसाठी ४२० रुपये तसेच उपरी व भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे दिलेल्या वीजजोडण्यांच्या पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी प्रत्येकी ३१० रुपये व थ्री फेजसाठी प्रत्येकी ५२० रुपये शुल्क आहे. तर उच्चदाब वर्गवारीसाठी ३१५० रुपये शुल्क लागू आहे. या शुल्कांवर १८ टक्के जीएसटी कर लागू आहेत. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत रक्कम आणि नियमानुसार पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत करावा असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत.

दरम्यान थकबाकीमुळे गेल्या महिन्याभरात पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ४३ हजार ६१५
आणि इतर अकृषक १३५७ अशा एकूण ४४ हजार ९७२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
यामध्ये पुणे जिल्हा- २९ हजार ४४०, सातारा- ३,२५८, सोलापूर- ६,१५४, कोल्हापूर- ३,०६२ आणि सांगली जिल्ह्यातील
३,०५८ थकबाकीदारांचा समावेश आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा
खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. ही कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा,
वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी. यासाठी वीजग्राहकांना
केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर
तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. सोबतच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व
लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी

छोटा शेख सल्ला दर्गा: ‘रील’ व्हायरल करुन अफवा पसरवणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांकडून FIR

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Computer Engineer Arrested In Pune | पुणे : दुकानातून लॅपटॉप चोरणाऱ्या कॉम्प्युटर इंजिनियरला सायबर पोलिसांकडून अटक