Pune Mahavitaran News | सौर ऊर्जा प्रकल्पांच्या एजन्सीजसाठी पुण्यात महावितरणकडून कार्यशाळा

पुणे : Pune Mahavitaran News | छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची (Solar Power Generation Project) उभारणी करणाऱ्या एजन्सीजच्या प्रतिनिधींना सर्व तांत्रिक व ‘ऑनलाइन’ प्रशासकीय कार्यवाहीची माहिती देण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये सोमवारी (दि. २०) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. (Pune Mahavitaran News)

सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या महावितरणच्या निवडसूचीवरील एजन्सीजच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे (मास्मा) MASMA (Maharashtra Solar Manufacturers Association) अध्यक्ष रोहन उपासनी (MASMA President Rohan Upasani) यांनी मुख्य अभियंता राजेंद्र पवार (Chief Engineer Rajendra Pawar) यांच्याकडे केली होती. ती लगेच मान्य करून एकदिवसीय कार्यशाळा (Mahavitaran One Day Workshop) आयोजित करण्याचे निर्देश पवार यांनी दिले. (Pune Mahavitaran News)

गणेशखिंड येथील महावितरणच्य लघु प्रशिक्षण केंद्रामध्ये सोमवारी (दि. २०) झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेत मुंबई मुख्यालयातील कार्यकारी अभियंता शरद बंड (Executive Engineer Sharad Band) व सहायक अभियंता इकबाल खुर्शिद (Assistant Engineer Iqbal Khurshid) यांची विशेष व्याख्याते म्हणून उपस्थिती होती. त्यांनी पुणे, कोल्हापूर (Kolhapur) व सांगली (Sangli) येथील ४५ एजन्सीजच्या प्रतिनिधींना प्रशिक्षणासह ‘ऑनलाइन’ प्रशासकीय कार्यवाहीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच संबंधित प्रश्नांचे निराकरण केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी यांनी पुढाकार घेतला. ‘मास्मा’चे अध्यक्ष श्री. रोहन उपासनी व पदाधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.

ग्रीन एनर्जीला प्राधान्य देत वीजग्राहकांकडून प्रामुख्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गणेशखिंड येथील विश्रामगृहाच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून त्याद्वारे
पुणे परिमंडलातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यासोबतच एजन्सीजच्या प्रतिनिधींसाठी देखील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी गती मिळेल व ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल असा विश्वास कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला.

Web Title :  Pune Mahavitaran News | Workshop by Mahavitaran in Pune for solar power projects agencies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalyukt Shivar Abhiyan | जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुणे जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit | अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित