Pune Mandai Traffic Jam | मेट्रोच्या कामामुळे मंडईतील वाहतूक कोंडी श्वास कोंडणारी ! वाहतूक पोलीस, मेट्रो आणि अतिक्रमण विभागाने सोडले पुणेकरांना वाऱ्यावर

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mandai Traffic Jam | मेट्रोच्या कामामुळे (Pune Metro) शहराच्या मध्यवर्ती मंडई परिसरात (Mandai) वाहतुकीचा पुरता बाजार उठला आहे. अगोदरच अरुंद रस्ते, त्याच्याच कडेला पथारी व्यावसायिक आणि अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे अक्षरशः ‘ श्वास कोंडणारी ‘ वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. याठिकाणी वाहतूक पोलिस आणि मेट्रोचे डोळेझाक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Pune Mandai Traffic Jam)

स्वारगेट ते निगडी मेट्रोच्या (Swargate To Nigdi Metro Route) महात्मा फुले मंडई चे काम वेगाने सुरू आहे. यासाठी शिवाजी रोडने (Shivaji Raod Pune) मंडई मार्गे शनिपार कडे जाणारा रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. तर स्थानकाचे आणि आर्यन वाहन तळाशेजारी तुळशी बागेकडे (Tulshibaug) जाणारा रस्ता तसे लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर मेट्रो ने बॅरिकेडींग केले आहे. (Pune Mandai Traffic Jam)

कुमठेकर रोडने शनिपार चौकातून शिवाजी रोड कडे येणाऱ्या बसेसही याच मार्गाने येतात. अशातच मंडईतील आर्यन या पाच मजली वाहन तळावर येणारी व बाहेर पडणारी वाहने देखील याच चौकात येतात. या ठिकाणी रस्ता अगोदरच अरुंद असून दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर विक्रेते बसलेले असतात. तर त्यांच्यापुढे रिक्षा चालक ग्राहकांची वाट पहात उभे असतात. त्यामुळे एकावेळी एखादं दुसरी टू व्हीलर अथवा रिक्षा जाऊ शकेल एवढीच जागा असते. ही परिस्थिती अगदी कुमठेकर रस्त्यापासून शनिपार चौक, मंडई ते शिवाजी रस्त्यावरील रामेश्वर चौकापर्यंत असते. त्यामुळे विश्रामबाग वाडा येथील सिग्नल वरून रामेश्वर चौक हे जेमतेम 400 मीटर अंतर संध्याकाळच्या वेळी कापायला अर्धा तासांहून अधिक वेळ लागतो.

यावरून मार्गक्रमण करणारा प्रत्येक नागरिक कासवगतीने वाहन चालवताना रस्त्याच्या कडेला आणि अगदी पदपथावर असलेली अतिक्रमण, रामेश्वर चौकातुन शनिपार कडे नो एंट्रीतून येऊन वाहतुकीचा विचका करणाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत असतात. या पट्ट्यात ना वाहतूक पोलिस (Pune Traffic Police) असतात ना मेट्रोचे सुरक्षा रक्षक. महापालिकेचा अतिक्रमण विभाग (PMC Anti Encroachment ) देखील याठिकाणी ‘जाणीवपूर्वक’ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत असतात.

Web Title : Pune Mandai Traffic Jam | Traffic congestion in the mandai due
to Metro work is suffocating! Pune Traffic Police, Pune Metro and PMC Anti Encroachment Department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा