पुणे : मराठा आरक्षणासाठी 20 ऑगस्टपासून चक्री उपोषण

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरासह पुण्यात देखील ठिय्या आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ती पोलिसांनी मागे घ्यावे. या मागणीसाठी राज्यभरातील विविध ठिकाणी 20 ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्यात येणार आहे. पुणे विभागीय कार्यालया समोर देखील आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.
[amazon_link asins=’B01K4K6266,B07G692KCS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’23f63c77-a2cf-11e8-93d0-750c6663333c’]
यावेळी कुंजीर म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 58 मोर्चे शांततेच्या मार्गात काढून देखील राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्याच्या निषधार्थ 9 ऑगस्ट रोजी राज्यातील ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्यावर चुकीच्या पध्द्तीने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ते पोलिसांनी मागे घ्यावे. तसेच मागील महिन्याभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घ्यावे.यासह अनेक मागण्यांसाठी राज्यभरात 20 ऑगस्टपासून चक्री उपोषण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर आरक्षण केव्हा देणार हे मुख्यमंत्र्यानी लेखी द्यावे. अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.