Pune Market Yard | 15 ऑगस्टला पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) मार्केट यार्ड (Pune Market Yard) येत्या मंगळवारी (दि.15) बंद ठेवण्यात येणार आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Krushi Utpanna Bazar Samiti Pune) सभापती यांनी जाहीर केले आहे. येत्या मंगळवारी मार्केट यार्डातील (Pune Market Yard) मुख्य बाजार, मोशी (Moshi) उपबाजार, मांजरी (Manjari) उपबाजार, उत्तमनगर (Uttam Nagar) उपबाजार, खडकी उपबाजार (Khadki Sub Market) बंद राहणार आहे.

मंगळवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्ड (Pune Market Yard) येथील फळे-भाजीपाला विभाग, केळी बाजार, गुरांचा बाजार, गुळभुसार विभाग, स्थापत्य विभाग, भांडार शाखा, छापाई लेखनसामुग्री, भुईकाटा केंद्र, पेट्रोलपंप विभाग, फुलांचा बाजार, पान बाजार, माती पाणी परिक्षण व अन्न भेसळ प्रतिबंधक प्रयोगशाळा बंद राहणार आहेत.

शेतकऱ्यांनी मंगळवारी शेतमाल विक्रीस बाजारात आणू नये. मार्केट यार्ड बंद राहणार असल्याची नोंद व्यापारी, व्यावसायिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nalasopara Crime News | पोलीस भरती प्रशिक्षण क्लासेसमध्ये मुलींचे लैंगिक शोषण, रेल्वे पोलीस दलातील दोघांना अटक

Chandrakant Patil – Ajit Pawar | पुण्यात चंद्रकांत पाटील तर कोल्हापूरात अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

Pune Crime News | डॉक्टराचे अपहरण करुन घरी नेऊन 25 लाखांच्या रोकडसह 27 लाख रुपयांचा दरोडा

Har Ghar Tiranga Campaign In Pune | प्रत्येक पुणेकराने आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

Pune Crime News | मैत्रिणीनेच घरातील दागिने नेले चोरुन; चेक देऊन केला बाऊन्स

Revolutionizing Reproductive Medicine: Exploring In-Vitro Gametogenesis (IVG)