Pune Mayor Muralidhar Mohol | राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवायच ‘सुई’चा पुरवठा बंद, महापौर मुरलीधर मोहोळ यांचा ‘पलटवार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लसीकरणासाठी नागरिक आटोकाट प्रयत्न करत असताना उपलब्ध असलेल्या लसी देण्यासाठी पुणे महानगरपालिका लस टोचण्यासाठी लागणारी सुई (Syringe) पुरवण्यात अपयशी ठरली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष (NCP City President ) प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केला आहे. यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Muralidhar Mohol) यांनी राज्य सरकारकडून पूर्वसूचनेशिवाय सुईचा पुरवठा बंद झाला असा पलटवार केला आहे. तसेच तातडीने सुई खरेदी करुन पुण्यातील लसीकरण (Vaccination) सुरळीत केल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Muralidhar Mohol) यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Muralidhar Mohol) म्हणाले, लसीकरण सुरु झाल्यापासून डोससोबत सुईचाही पुरवठा होत होता.
मात्र राज्य सरकारकडून (State Government) पूर्वसूचनेशिवायच सुईचा पुरवठा (Needle supply) बंद झाला.
शिवाय ही सुई खुल्या बाजारात उपलब्ध नाही. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे लसीकरणावर झाला.
लसीकरण बंद राहू नये म्हणून तातडीने 1 लाख पर्यायी सुई खरेदी केल्याने लसीकरण सुरळीत झाले आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) दोन्ही लाटांचा आजवर सक्षमपणे सामना करत सर्व यंत्रणा उभ्या केल्या.
हे पुणेकर जाणतात, असा टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले प्रशांत जगताप ?

लसीकरणासाठी नागरिक आटोकाट प्रयत्न करत असताना उपलब्ध असलेल्या लसी देण्यासाठी पुणे महानगरपालिका लस टोचण्यासाठी लागणाऱ्या सुई (Syringe)
पुरवण्यात अपयशी ठरली आहे.
तब्बल 8,500 हजार कोटी रुपयांचे बजेट (Budget) असणारी पुणे महानगरपालिका आपल्या नागरिकांना लस देण्यासाठी सध्या सुई पुरवू शकत नाही
ही फार मोठी शोकांतिका असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

 

तसेच भारतीय जनता पक्षाच्या (BJP) धोरणांमुळे पुणे महानगरपालिका दिवाळखोरीत निघत असल्याने अवघ्या एक रुपयात मिळणारी सुई विकत घेण्याची पुणे महानगरपालिकेची ऐपत नसेल तर पुणेकर नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सुई देण्यास तयार असल्याचे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

 

Web Title : Pune Mayor Muralidhar Mohol | Supply of ‘needles’ stopped without prior notice from maharashtra government, Mayor Murlidhar Mohol’s reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | पुण्यातील रस्ते खोदाईनंतरच्या दुरूस्तीच्या कामांसाठी पुन्हा कोट्यवधीच्या निविदा; महापालिकेचा ‘आंधळ दळतयं कुत्रं पीठ खातयं’चा कारभार

NCP Prashant Jagtap | सिरिंजच्या तुटवड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा सत्ताधाऱ्यांवर ‘हल्लाबोल’

Maharashtra College Reopen | राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतरच सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती