Pune Metro News | पुणे : आता निगडीपर्यंत धावणार मेट्रो, राज्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे मेट्रो (Pune Metro News) आता निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत धावणार आहे. या संबंधीच्या राज्य सरकारच्या (State Government) प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने मान्यता दिली आहे. पिंपरी ते निगडी विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी ही तीन स्थानके असतील. प्रस्तावित ४.१३ किमी लांबीच्या कॉरिडॉरचा खर्चात केंद्र सरकार (Central Government) आणि महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. (Pune Metro News)

निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची येथील नागरिकांची मागणी होती. त्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील सिटीझन फोरम, विविध संघटनांनी आंदोलन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane), आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge), उमा खापरे, अश्विनी जगताप यांनी प्रयत्न केले.

त्यानंतर महापालिका आणि राज्य शासनाने निगडीपर्यंतच्या मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. केंद्र सरकारची मान्यता मिळावी यासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. मागील पंधरा दिवसापूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Minister Hardeep Singh Puri) यांची भेट घेतली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे.

निगडी पर्यंतच्या मेट्रोला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मान्यता दिल्याचे पत्र केंद्र सरकारचे सचिव सुनील कुमार यांनी राज्य शासनाला पाठविले आहे. (Pune Metro News)

पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) ते फुगेवाडी
हा मेट्रो मार्ग होता. आता पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३ .९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे.
आकुर्डी, चिंचवड आणि निगडी परिसरातील नागरिकांची निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

आयुक्त शेखर सिंह या प्रस्तावित मार्गाची माहिती देताना सांगितले की, हा प्रस्तावित कॉरिडॉर ४. १३ किमी लांबीचा आहे.
तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च ९१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

लवकरच कामाला सुरुवात होईल. वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि
पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खेड शिवापूर, हवेली परिसरात घरफोडी करणारा सराईत चोरटा गजाआड, पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त