Pune Metro | मेट्रोतून सायकल घेऊन प्रवास करण्यास महामेट्रोची मान्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे मेट्रोचे (Pune Metro) लोकार्पण झाल्यानंतर पुणे मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता पुणे मेट्रोमधून (Pune Metro) तुमची स्वत:ची सायकल घेऊन प्रवास (Travel by Bicycle) करु शकता. शशांक वाघ (Shashank Wagh) असे सायकल घेऊन प्रवास करणारे सोमवारी पहिले प्रवासी (First Traveler) ठरले. गरवारे महाविद्यालय (Garware College) ते आनंदनगर (Anandnagar) असा प्रवास त्यांनी केला.

 

आज सकाळी शशांक वाघ हे आपली सायकल घेऊन गरवारे स्थानकात आले. सकाळी बरोबर आठ वाजता मेट्रो (Pune Metro) सुरु झाली. सायकल घेऊन स्थानकात आलेल्या वाघ यांना सुरक्षा रक्षकाने (Security Guard) आडवले. मात्र, वाघ यांनी त्याला वरिष्ठांसोबत बोलण्यास सांगितले. महामेट्रोने (Mahametro) सुरुवातीपासूनच आपली स्वत:ची सायकल घेऊन मेट्रोने प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. सुरक्षा रक्षकाला तसे सांगितल्यावर वाघ यांना स्थानकात प्रवेश देण्यात आला. वाघ यांनी तिकीट काढले. सायकल घेऊन स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर आले. ते मेट्रोत सायकलसह आत आले आणि त्यांनी प्रवास केला. आनंदनगर येथे गाडीतून बाहेर येऊन ते सायकल घेऊन स्थानकाबाहेर आले.

 

वाघ यांनी सांगितले की, रस्त्यावरील वाहतूकीचा (Road Traffic) ताण कमी करण्यासाठी सायकल व मेट्रो हा उत्तम सहयोग आहे. परदेशांमध्ये सायकलींसाठी स्वतंत्र बोगी असते. आपल्याकडे अशी स्वतंत्र बोगी करणे शक्य नसली तरी महामेट्रोने परवानगी दिली हे चांगले झाले.

महामेट्रोचे संचालक जनसंपर्क अधिकारी (Director Public Relations Officer) हेमंत सोनवणे (Hemant Sonawane) यांनी सांगितले की, सायकलसह प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.
परंतु प्रवास करताना अन्य प्रवाशांना सायकलचा त्रास होणार नाही याची सायकलधारकांनी काळजी घ्यावी.
सध्या तरी सायकलसाठी स्वतंत्र जागा नाही. परंतु डब्याच्या मागे वगैरे सायकल लावता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Metro | pune metro you can travel by metro by bicycle recognition of mahametro

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा