Pune Mumbai Expressway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यु !

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मुंबई – पुणे महामार्गावरील अपघातांचं (Pune Mumbai Expressway Accident) प्रमाण वाढत चाललेलं पाहायला मिळत आहेत. अशातच मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली, ही धडक इतकी जोरात झाली की या थरारक अपघातामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर आणखी एक जण हा जखमी आहे.

 

अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील देवले पूल (Devale Bridge) ते ताजे पेट्रोल पंप दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली. देवले पुलाजवळ एका मार्गिकेचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे दोन मार्गिंकावरून वाहतूक सुरु आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी अपघात स्थळावर धाव घेतली.

 

अपघातग्रस्त दोन्ही ट्रक क्रेनच्या सहाय्याने सकाळी बाजूला काढण्यात आले. सकाळी दहापर्यंत या भागातील वाहतूक सुरळीत झाली. अपघातात मृत्यूमुखी पडलेला ट्रकमधील एकाचे नाव पत्ता समजू शकले नाही, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) दिली.

 

दरम्यान, देवले पुल मृत्युचा सापळा बनत चालला आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
आठवड्यापूर्वी देवले पुलाजवळ कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.

 

Web Title :- Pune Mumbai Expressway Accident | One killed in Mumbai Pune expressway accident

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा