Pune News : शहरात ‘या’ 42 ठिकाणी निर्बंध, सोसायट्यांसाठी नवीन नियमावली जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने पालिका प्रशासनाकडून उपाय योजना सुरु करण्यात आल्या आहेत. शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक असलेले 42 भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पालिकेच्या 15 पैकी दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही क्षेत्र असून पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकही क्षेत्र नाही. दर 15 दिवसांनी 42 प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेऊन त्याची पुनर्रचना केली जाणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील नवे निर्बंध

सोसायट्यांमध्ये प्रवेश बंद – बाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सोसायट्यांच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात येणार असून रुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. सोसायटीच्या सभासदांची बैठक घेऊन सूचना देत एकत्र येण्यास मनाई केली जाणार आहे.

कचऱ्याची स्वतंत्र विल्हेवाट – या सोसायट्यांमधून जमा होणाऱ्या कचऱ्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यात येणार आहे. बाधित नसलेल्यांना कामाची मुभा असणार आहे. ज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामासाठी बाहेर जाता येणार आहे. त्यांच्यावर बंधने नसणार आहेत.

क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

वानवडी -3

नगर रस्ता – 3

सिंहगड रस्ता – 4

बिबवेवाडी -5

हडपसर – 7

शिवाजीनगर -4

धनकवडी – 5

वारजे-कर्वेनगर – 4

कोंढवा – येवलेवाडी -2

भवानी पेठ -5