Pune Municipal Corporation (PMC) | व्यावसायिक मिळकतींना ‘मिटर’द्वारे पाणी पुरवठा होतोय की नाही? सर्वेक्षण करून तातडीने मिटर बसविणार – पुणे महापालिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | शहरातील भाड्याने देण्यात येणारे लॉन्स (Lawns In Pune), मंगल कार्यालये (Marriage Hall In Pune), हॉल्स तसेच हॉटेल्स (Hotels In Pune) यांना मीटरद्वारेच (Professional Water Meter) पाणी पुरवठा होतोय? याचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मीटर (Water Meters In Pune) बसविलेले नसतील त्या ठिकाणी तातडीने मिटर बसविण्यात येतील, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar) यांनी दिली. Pune Municipal Corporation (PMC)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

महापालिकेने नुकतेच कर्वेनगर (Karve Nagar) येथील डी.पी. रस्त्यावरील (DP Road) नदी काठच्या हरितपट्टयातील अतिक्रमणांवर कारवाई केली आहे (PMC Action On Encroachment Of DP Road). या कारवाईमुळे याठिकाणी असलेली हॉटेल्स, लॉन्सला होणार्‍या पाणी पुरवठ्याचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. येथील कामे बेकायदा झाली असतील तर त्यांना करण्यात येणारा पाणी पुरवठा अधीकृत कसा, असा प्रश्‍न उपस्थित झाल्याने महापालिका आयुक्तांनी याठिकाणच्या लॉन्स आणि हॉटेल्सचा पाणी पुरवठा तपासण्याचे आदेश दिले आहेत. Pune Municipal Corporation (PMC)

 

यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (PMC Water Supply Superintendent Aniruddha Pawaskar) यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की डी.पी. रस्त्यावरील मंगल कार्यालये, लॉन्स आणि हॉटेल्सला होणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. बेकायदा नळजोड घेतले असतील तर ते काढून टाकण्यात येतील. तसेच डी. पी. रस्त्यासोबतच शहरातील विविध भागात उभारण्यात आलेली लॉन्स, मंगल कार्यालये, हॉटेल्स, ढाबे अशाठिकाणी जेथे पाण्याचा व्यावसायीक वापर करण्यात येतो, तेथे पाणी पुरवठा कसा करण्यात आला आहे तसेच मिटर बसविण्यात आले आहेत की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. पाण्याचा व्यावसायीक वापर होत असेल तर त्याठिकाणी मिटरद्वारेच पाणी पुरवठा केला जाणार आहे.

 

यासाठी मिळकतकर विभागाकडून (PMC Property Tax Department) व्यावसायीक मिळकतींची माहिती घेतली आहे. शहरात सुमारे दीड लाख व्यावसायीक मिळकती आहेत. परंतू प्रत्यक्षात ४० हजार नळजोडांवर मिटर बसविण्यात आला आहे. हे नळजोड देखिल साधारण २० ते २२ वर्षांपुर्वी बसविलेले आहेत. तसेच बर्‍याच व्यावसायीक मिळकती या रेसिडन्शीयल इमारतींमध्ये आहेत. त्यामुळे व्यावसायीक मिळकतींची पाणीपट्टी आकारणी देखिल मिळकतकर विभागाकडूनच होते. यामुळे पुढील काळात प्रत्येक व्यावसायीक मिळकतींना मिटरद्वारे पाणी पुरवठा करून त्याच्या बिलाची मिळकत कर विभागाऐवजी पाणी पुरवठा विभागाकडूनच आकारणी करता येईल का याची देखिल चाचपणी करत आहोत, असेही पावसकर यांनी नमूद केले.

 

शहराच्या विविध भागामध्ये सध्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी आहेत. महापालिकेने २९ मार्चला या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली आहे.
या हेल्पलाईनवर आज दुपारपर्यंत ४२४ तक्रारी आल्या आहेत.
या तक्रारी केवळ नवीन उपनगरातूनच नव्हे तर शहराच्या मध्यवर्ती व जुन्या उपनगरांतूनही आल्या आहेत.
यापैकी साधारण १०० च्या आसपास तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
ऐन उन्हाळ्यात जेमतेम २५ टक्के तक्रारींचाच निपटारा होत असल्याने नागरिकही त्रस्त झाले
असून प्रशासन गंभीर विषयावरही असंवेदनशील असल्याचा आरोप होउ लागला आहे.
याबाबत बोलताना अनिरुद्ध पावसकर यांनी पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारीं सोडविण्यासाठी युद्धस्तरावर काम करण्यात येत आहे.
अनेक ठिकाणी खोदाई व दुरूस्तीमध्ये वेळ लागत असल्याने विलंब होत आहे.
परंतू यातूनही प्रशासन तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Is water being supplied to commercial properties through meters or not? Meter will be installed immediately after conducting survey – PMC Water Supply Superintendent Aniruddha Pawaskar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya Attack Case | किरीट सोमय्यांवर हल्ला प्रकरणी शिवसेना नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक

 

Pune Crime | IPL सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या परेश भूत, प्रफुल्ल कलावटे, अक्षय ठोंबरे आणि महेश क्षिरसागरला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

 

Pune Crime | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त; साडे तीन लाखांचे 11 पिस्टल जप्त (व्हिडिओ)