Pune Municipal Corporation (PMC) | लहान – मोठ्या पथारी व्यावसायिकांना PMC च्या मुख्यसभेचा दिलासा, मात्र…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | शहरातील पथारी, हातगाडी (Handcart), लहान स्टॉलधारक (Small Stall Holder) आणि मोठे स्टॉलधारकांना (Large Stall Holder) महापालिकेच्या मुख्यसभेने दिलासा दिला आहे. महापालिकेकडून या व्यावसायिकांकडून आकारण्यात येणाऱ्या भाड्यामध्ये कपात (Rent Reduction) करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी (दि.10) मुख्यसभेने मंजुरी दिली आहे. पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाकडून आकारण्यात येणारे भाडे कमी होणार असल्याने या प्रस्तावाची अंमलबजावणी (Implementation) प्रशासन करणार का याबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

 

पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून (Encroachment Elimination Department) शहरातील पथारी, हातगाडी, लहान स्टॉलधारक आणि मोठे स्टॉलधारकांना परवाना दिला जातो. परिसर आणि स्टॉलच्या आकारानुसार अतिक्रमण विभागाकडून भाडे आकारले जाते. यापूर्वी लहान स्टॉलधारकांकडून 20 रुपये तर मोठ्या स्टॉलधारकांकडून 2000 रुपये मासिक भाडे घेतले जात होते. परंतु हे भाडे खूपच कमी असल्याने प्रशासनाने नवीन भाडे आकारण्यास सुरुवात केली. मध्य शहर आणि उपनगरांमध्ये वेगवेगळे झोन (Zone) तयार करुन लहान व्यावसायिकांना दिवसाला 50 तर मोठ्या व्यावसायिकांकडून दिवसाला 200 रुपये भाडे आकारण्यात येत होते.

प्रशासनाने आकारणी केलेले नवीन भाडे वाजवी नसून शहरातील पथारी, हातगाडी, लहान स्टॉलधारक आणि मोठे स्टॉलधारकांवर अन्याय करणारे असल्याने ते कमी करण्याची मागणी केली जात होती.
व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी याबाबत नगरसेवकांसमोर (PMC Corporators) आपली व्यथा मांडली होती.
त्यानुसार नगरसेवकांनी भाडे कमी करुन मासिक भाडे 1500 आणि 2000 करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला (PMC Standing Committee) दिला होता.
हा प्रस्ताव (Proposal) मंजुर करुन स्थायी समितीने अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेकडे पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावाला गुरुवारी मुख्य सभेने मंजुरी दिली.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | PMCs GB meeting gives relief to small and big bed traders but

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा