Pune Municipal Elections 2022 | महापालिका निवडणूक ! 31 मे रोजी गणेश कला क्रिडामंचमध्ये आरक्षण सोडत; प्रशासनाची तयारी सुरू

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Elections 2022 | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आगामी सार्वत्रिक निवडणुकीची (PMC Elections 2022) आरक्षण सोडत (PMC Elections Reservation Draw) ३१ मे रोजी स्वारगेट (Swargate) येथील गणेश कला क्रिडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे होणार आहे. सोडतीसाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले असून ३० मे रोजी रंगीत तालिमही होणार आहे. (Pune Municipal Elections 2022)

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ रोजी आरक्षण सोडत होणार आहे. अद्यापही ओबीसी आरक्षणाबाबत अनिश्‍चितता असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम सुरू केला आहे. येत्या ३१ मे रोजी १७३ सदस्य संख्या असलेल्या ५८ प्रभागांमधील अनुसुचित जाती (Scheduled Castes), अनुसुचित जमाती (Scheduled Tribes) आणि महिलांसाठीच्या ५० टक्के आरक्षीत जागांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

सोडतीसाठी स्वारगेट येथील गणेश कला क्रिडामंच हे ठिकाण निश्‍चित करण्यात आले आहे. अनुसुचित जाती, जमाती व महिला आरक्षणासाठी चिठ्ठया तयार करणे, सोडतीचे व्हिडीओ चित्रीकरण करणे, सोडतीचे लाईव्ह प्रसारण करणे, स्टेजवर तसेच बाहेरील बाजूस एलईडी स्क्रिन बसविण्यात येणार आहेत. आरक्षणांची सोडत चिठ्ठयांद्वारे करण्यात येणार असून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते या चिठ्ठया काढण्यात येणार आहेत. सोडतीसाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने याठिकाणी पोलिस बंदोबस्तासोबतच (Pune Police Bandobast) महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

Web Title : Pune Municipal Elections 2022 | PMC election reservation draw at Ganesh Kala Krida manch swargate on 31st May; Administration begins preparations

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त