चंदनापुरी घाटात दरड कोसळली ; पुणे-नाशिक रस्त्यावर कोंडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – चंदनापुरी घाटात रात्री मोठी दरड कोसळली. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आठवड्यात तिसरी घटना आहे. रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

चंदनापुरी घाट परिसरात आठवड्यापासून पावसाची संततधार सुरु आहे. रात्री डोंगराचा काही भाग संरक्षक जाळ्यासह नाशिककडे जाणाऱ्या लेनवर मधोमध कोसळला. सुदैवाने या घटनेत कसलीही हानी झाली नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही या घटनेची माहिती घेतली असून, दरड हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक तूर्तास एकेरी सुरु असल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल होत आहेत.

आज सकाळी साडेआठच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घाट परिसरात अनेकदा दरड कोसळून वाहतूक ठप्प होते.

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’