Pune Navale Bridge Accident | दुर्देवी ! पुण्यातील नवले ब्रीजवर टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, नात जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Navale Bridge Accident | भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरची धडक एका दुचाकीला बसली. यामध्ये नात आणि आजी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात (Pune Navale Bridge Accident) पुण्यातील नवले ब्रीजवर सोमवारी (दि.13) रात्री पावणे दहाच्या सुमारास झाला होता.

मीना राजेंद्र वाघमारे (वय- 45 रा. कोळेवाडी, कोथरुड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
अपघातामध्ये सई वाघमारे ही जखमी झाली आहे. याप्रकरणी राजेंद्र वाघमारे यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station) फिर्याद दिली आहे.
वाघमारे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकाविरुद्ध (Tempo Traveler driver) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र आणि त्यांची पत्नी मीना व नात सई सोमवारी (दि.13) दुचाकीवरून घराकडे चालले होते.
त्यावेळी वारजे ब्रीजवर भरधाव वेगात आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर धडक त्यांच्या दुचाकीला बसली.
या धडकेत तिघेही खाली पडले. त्यामुळे मीना आणि सई जखमी झाले होते.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मीना यांच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारवे (PSI Parve) करीत आहेत.

 

Web Title : Pune Navale Bridge Accident | Unfortunate! Woman killed, granddaughter injured in collision of Tempo Traveler on Navale Bridge in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rains | पुण्यासह पालघर, नाशिकमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra ATS | मुंबईत एकही दशतवादी आला नाही, राज्यात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत – एटीएस प्रमुख विनित अग्रवाल

Udayanraje Bhonsle | खा. उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याची घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण