Pune Navale Bridge Accident | दुर्दैवी ! नवले पुलाजवळील अपघातात 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | पुण्यातील मुंबई-बंगलोर महामार्गावर (Mumbai-Bangalore Highway) नवले ब्रीज जवळ (Pune Navale Bridge Accident) आज सकाळी पुन्ह भीषण अपघात झाला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो वेगाने पाठीमागे गेला आणि काही वाहनांना जाऊन धडकला. नवले ब्रीज जवळ झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये चेतन सोळंकी (Chetan Solanki) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुळचा धुळ्याचा असलेला चेतन सोळंकी हा पुण्यातील एका कंपनीत कामाला आहे.
चेतनचे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी लग्न (Got Married Just 15 Days Ago) झाले होते.
नव्या नवरीला घेऊन तो पाच दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी तो कामावर जाण्यासाठी निघाला होता.
गाडीची वाट पाहात तो मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रीज जवळ उभा होता. कंपनीची गाडी त्याला नेण्यासाठी येण्यापूर्वीच ब्रेकफेल झालेला कंटनर काळ बनून आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

चेतनचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. चेतनला पाहण्यासाठी कुटुंब ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) पोहोचले. मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या चेतनला ओळखणंही कठीण झाले. त्याच्या पश्चात दोन बहिणी (Two sister) असून एका बहिणीचे लग्न झाले आहे. तर दुसऱ्या बहिणीचे लग्न अद्याप झालेले नाही. तिच्या लग्नाची जबाबदारी चेतन याच्यावर होती. चेतनचा अपघातात मृत्यू (Accidental Death) झाला आहे हे त्याच्या पत्नीला कसे सांगायचे असा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे. (Pune Navale Bridge Accident)

अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस फरार कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत.

Web Title : Pune Navale Bridge Accident | young man who got married just 15 days ago died accident near navale bridge pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात