Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP News | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. यातच राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याने शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातील अजित पवार यांच्या नावाची कोनशिलेची फरशी काढून टाकली. तसेच त्याठिकाणी गोंधळ घालून तणावाची परिस्थीती निर्माण केल्या प्रकरणी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यासह नऊ पदाधिकाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Pune NCP News)

याबाबत लावण्या मुकुंद शिंदे (रा. शिवाजीनगर गावठाण) यांनी शुक्रवारी (दि.23) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रशांत जगताप, सुषमा सातपुते, प्रियंका खरात, प्रियंका सोनवणे, अरबाज जमादार, लखन वाघमारे, वंदना मोडक, दिपाली कवडे, अक्षता भिमाले यांच्या सह इतर कार्यकर्त्यांविरोधात आयपीसी 153, 143, 147, 149, 500, 501, 504, 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 7 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घडला होता.

केंद्रीय निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले. यानंतर पुण्यात शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते.

त्यांनी डेंगळे पुलाजवळील पक्ष कार्यालयात 7 फेब्रुवारी रोजी निषेध बैठक घेत जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी काही कार्य़कर्त्यांनी अजित पवार यांचे नाव असलेली कार्यालयाच्या उद्घाटनाची कोनशिलेची फरशी काढून टाकली. तसेच या फरशीवरील अजित पवार यांचे नाव हातोड्याने तोडून टाकले.

ही बाब अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी पक्ष कार्यालयात धाव घेतली. यावेळी अजित पवार गट व शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्य़कर्ते आमने सामने आले. शरद पवार गटाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला.
आता या प्रकरणात शरद पवार गटाच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे शरद पवार गटातील कार्यकर्त पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे (API Savita Sapkale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन