Pune NCP on Gopichand Padalkar | ‘गोपीचंद पडळकरांना येरवडा मनोरुग्णालयात भरती करा’, पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

गोपीचंद पडळकरांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखं आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP on Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्द्यावरुन सरकारला पत्र पाठवलंय. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच त्यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. यावेळी, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) आपण मानत नसल्याचे म्हटले. तसेच, पडळकरांनी अजित पवार यांच्यावर ‘लांडग्याचं पिल्लू’ म्हणत बोचरी टीकाही केली. तसेच आपण त्यांना सिरीयस घेत नसल्याचं म्हटलं. त्यावरुन, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP on Gopichand Padalkar) चांगलीच आक्रमक झाली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरुन वडगाव शेरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच युवक काँग्रेस पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आले. येरवडा प्रदेश मनोरुग्णालयाच्या (Yerawada Region Psychiatric Hospital) वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवदेन दिले आहे. यामध्ये त्यांनी गोपी याला मनोरुग्णालयात भरती करण्यात यावे. तसचे त्याच्यावर त्वरित उपचार सुरू करावेत अशी मागणी केली आहे. निवेदन देताना माजी नगरसेवक सतीश म्हस्के, ॲड. भैयासाहेब जाधव प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, कुलदीप शर्मा, गुरुमीत सिंग गिल, मोरेश्वर चांदेरे, गणेश खांदवे, राजकुमार टिंगरे, संजय वाघमारे, सुशांत माने, पप्पू राखपसरे, मनोहर राखपसरे उपस्थित होते. (Pune NCP on Gopichand Padalkar)

काय म्हणाले पडळकर?

गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही.
म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत.
अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल