Pune NCP | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फिजियो थेरपी शिबिराचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस पार पडला. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सर्वत्र अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अशातच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (Pune NCP) फिजियो थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम चार दिवस राबवण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ॲड. स्वप्निल जोशी (Adv. Swapnil Joshi) आणि लावण्या शिंदे (Lavanya Shinde) यांनी सांगितले.

 

फिजियो थेरेपी शिबिर 24 जुलैपासून 27 जुलैपर्यंत सकाळी 11 ते सांयकाळी 4 वाजता या कालावधीत राबवण्यात येणार आहे. रविवारी कार्यक्रमाचे उद्घाटन आणि दीप प्रज्वलन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), प्रवक्ते प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh), रुपालीताई पाटील (Rupalitai Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune NCP)

दरम्यान, या कार्यक्रमाला युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे, युवती शहर अध्यक्षा सुषमा सातपुते,
निलेश निकम, बाळासाहेब बोडके, उदय महाले, औदुंबर खुणे-पाटील, राजू साने, सुकेश पासलकर,
महेश हांडे, कार्तिक थोटे, जावेद इनामदार, प्रशांत प्रभाले, केतन ओरसे, निलेश रुपटक्के, विशाल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | Physiotherapy camp organized on the occasion of Ajit Pawar’s birthday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा