Pune NCP | शहराला शिस्त लावत असतानाच शहरातील व्यावसायिक अडचणीत येऊ नयेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन

सारसबाग चौपाटी बाबतची कारवाई थांबवण्यात यावी - NCP

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील प्रत्येक व्यक्तीसाठी सारस बागेत (Saras Baug) असणारी चौपाटी (Chowpatty) हे कधी ना कधी भेट दिलेले ठिकाण आहे. पुणे महानगरपालिकेच्या कॉफी टेबल बुक मध्ये (Coffee Table Book) अभिमानाने सारसबाग चौपाटीचे नाव “प्राईड ऑफ पुणे” (Pride of Pune) म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. असे असताना पुणे महानगरपालिकेत ने अतिक्रमण विरोधी कारवाई (Anti-Encroachment Action) करत संपूर्ण चौपाटी सिल केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) वतीने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांना निवेदन दिले आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सारस बागेतील चौपाटी येथील कारवाई थांबवण्याची मागणी करत शहराला शिस्त लावत असतानाच शहरातील व्यवसायिक अडचणीत येऊ नयेत असे म्हटले.

 

यावेळी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम (Former Standing Committee Chairman Ashwini Kadam) व सारसबाग चौपाटीतील व्यावसायिक देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने (Pune NCP) दिलेल्या निवेदनात म्हटले की, सारसबाग चौपाटी ही ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्यावर कुठलीही रहदारी नाही, इतर कुठल्याही मोठ्या वाहनांची ये-जा होत नाही. त्या रस्त्याला जर गेल्या 60 वर्षांपासून असणाऱ्या चौपाटीवर अचानकपणे झालेली कारवाई चुकीची आहे. येथे व्यवसाय करणारे व्यवसायिक गेल्या 60 वर्षांपासून या ठिकाणी आपला व्यवसाय करतात. त्यांची दुकाने अशी अचानक पणे सिल करणे देखील चुकीचे आहे. त्याऐवजी पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी चौपाटी विकसित (Developed) करावी व सर्व व्यावसायिकांना जागा ठरवून देत त्याप्रमाणे कर लावण्यात यावा व पुन्हा ही चौपाटी सुरू करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना करण्यात आली. याबाबत येत्या गुरुवारी 26 मे रोजी आयुक्तांच्या दालनात याबाबत बैठक आयोजित करत या प्रश्न सोडविणार असल्याचे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

यासंदर्भात प्रशांत जगताप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्व स्टॉलधारकांच्या पाठीशी आहे, कारण या स्टॉलवर येणारा ग्राहक हा सर्वसामान्य पुणेकर असतो.
त्या सर्वसामान्य पुणेकरांसाठी असणारी ही चौपाटी वाचली पाहिजे, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे.
पुणे शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेली अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे बऱ्याच ठिकाणी व्यावसायिक (Professional) अडचणीत आले आहेत,
अगोदरच कोविडच्या काळात 2 वर्ष सर्वांचे व्यवसाय बंद होते.
ते पुन्हा सुरू झाले असतानाच आता पुन्हा अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या सर्वच ठिकाणी सामंजस्याने मार्ग काढला गेला पाहिजे.
शहराला शिस्त लावत असतानाच शहरातील व्यावसायिक अडचणीत येऊ नयेत ही आमची प्रामाणिक मागणी आहे”,
असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

 

Web Title :- Pune NCP | While disciplining the city, the business should not get in trouble in the city, said the NCP to the Pune Municipal Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे महापालिका समाविष्ट २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी सल्लागार नेमणार

 

ACB Trap Pune | लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार व होमगार्डवर पुणे एसीबीकडून गुन्हा दाखल

 

Latur News | लातूर जिल्ह्यातील घटना ! लग्नसमारंभात सुमारे 250 जणांना विषबाधा, वेळीच उपचार केल्याने धोका टळला