Pune News : ब्ल्यू फिल्म लावून 48 वर्षीय पतीनं केले 44 वर्षीय पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य, कोथरूड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ब्ल्यू फिल्म लावत पतीने अघोरी पद्धतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोथरुड परिसरात हा प्रकार घडला आहे. तर त्यांच्या इच्छेविरुद्ध गर्भपात देखील केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी 48 वर्षीय पतीला अटक केली आहे. तर याबाबत 44 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आरोपी सोबत 1996 साली लग्न झाले आहे. मात्र आरोपीने लग्न झाल्यापासून फिर्यादीची इच्छा नसतानाही तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. तसेच, त्यांना शिवीगाळ केली. तर अनेकवेळा ब्ल्यू फिल्म लावून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध अघोरी पद्धतीने शरीरसंबंध ठेवले.

तसेच फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केला. दरम्यान त्यांना एक मुलगी आहे. त्या मुलीने आरोपीकडे पैसे मागितले. त्यावेळी आरोपीने तीला शिवीगाळ करीत मारहाण केली. फिर्यादी महिलेचे आणि मुलीचे पालनपोषण करण्याची जबाबदारी असतानाही आरोपीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वानवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.