वटपौर्णिमा : महिलांनो वडाची पुजा करायला जाताय, सौभाग्यालंकाराची ‘अशी’ घ्या काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वटपोर्णिमेला पतीच्या दीर्घायुषाची कामना करण्यासाठी पूजा करणाऱ्या महिलांना आता सौभाग्यालंकार जपण्यासाठी प्रयत्न करण्याची पाळी आली आहे. गतवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांना दोघा चोरट्यांनी लक्ष्य करुन पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये धुमाकुल माजविला होता. सुमारे तीन तासात त्यांनी तब्बल १५ जणांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून नेले होते.

निर्सत:च दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे, या हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपला पती सत्यवान याचे यमाकडून प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे. त्यावरुन महिला दीर्घायुषी असलेल्या वडाप्रमाणे आपला पतीही दीर्घायुषी व्हावा, अशी कामना करत वडाची पुजा करतात. त्यासाठी वटपोर्णिमेला त्या उपवास करतात. सकाळीच वडाची पुजा करण्यासाठी त्या दागदागिने घालून घराबाहेर पडतात.

अशी घ्यावी काळजी

महिलांनी पूजा करण्यासाठी जाताना दागिने घातली तर ते सहजपणे दिसतील असे बाहेरच्या बाजूला ठेवू नये. शक्यतो पदराखाली ठेवावेत. एकेरी रस्त्याने जाताना चोरटे हे प्रामुख्याने पाठीमागून येऊन गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन जात असल्याचे आजवर झालेल्या चोऱ्यांमधून दिसून आले आहे. त्यामुळे महिलांनी रस्त्यानी जाताना विशेषत: एकेरी रस्त्याने जाताना वाहनांच्या विरुद्ध बाजूने जावे, जेणे करुन समोरुन येणारे वाहनचालक दिसून येतील.

हातात पुजेची थाळी असल्याने शक्यतो महिलांना प्रतिकार करता आला नसल्याचे गेल्या वर्षी घडलेल्या घटनेमध्ये दिसून आले आहे. तसेच आजवरच्या बहुतेक मंगळसुत्र चोरीच्या घटनांमध्ये महिला या प्रामुख्याने एकट्या असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पूजेला जाताना शक्यता महिलांनी एकत्रितपणे जावे. त्यामुळे चोरट्यांना संधी मिळू शकणार नाही.

एखाद्या दुचाकी वाहनावरील चोरटे हे पुढे जाऊन पुन्हा मागे आले तर त्यांच्यावर लक्ष ठेवावे. महिलांच्या आजू बाजूला घुटमळत असतील तर लोकांनी व महिलांनी तातडीने इतरांना सावध करावे.
अशी घटना घडल्यानंतर अनेकदा महिला घाबरुन जातात. त्यांना काही सुचत नाही. अशावेळी त्यांनी आरडाओरडा करुन आजू बाजूच्या लोकांना सावध करावे. चोरट्यांच्या वाहनाचा क्रमांक पाहण्याचा प्रयत्न करावा.

अशा घटना घडल्यानंतर अनेकदा महिला या घरी गेल्यावर इतरांना कळवून त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधतात. तसे न करता त्यांनी तातडीने १०० क्रमांकावर फोन करु अशी घटनेची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वटपोर्णिमेचा सण लक्षात घेऊन शहर पोलीस दलाकडून संपूर्ण शहरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले की, वटपोर्णिमेला सकाळी ६ वाजल्यापासून शहरात नाकाबंदी करण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करुन त्यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जेथे वटाची पुजा होते, त्या परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. उद्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे

आरोग्य विषयक वृत्त –

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

तेलकटपणामुळे केसांत होऊ शकतो कोंडा

माता मृत्यू दर रोखण्यासाठी लोक चळवळ राबवा- डॉ. हर्षवर्धन

वीस वयानंतर मुलींच्या शरीरात होतात ‘हे’ बदल