Pune News | कसबा मतदारसंघातील बांधकामांना UDCPR कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या

माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | गावठाण भागातील अनेक वाडे आणि जुन्या सोसायट्यांचा विकास होणे अत्यंत गरजेचे असून युडीसीपीआर (UDCPR) नियमावलीमुळे अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या नियमावलीनुसार बांधकाम १५ मीटर उंचीच्या वर गेल्यास एक मीटर साइड मार्जिन सोडण्याची अट घालण्यात आल्याने पुनर्विकसन करताना अडचण निर्माण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कसबा विधानसभा निवडणूक (Kasba Peth Assembly constituency) प्रमुख आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी या नियमात शिथिलता आणण्यासाठी नुकतीच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत निवेदन देत सविस्तर चर्चा केली. (Pune News)

पुणे शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. पुरातत्व विभागाच्या नियमावलीनुसार या वस्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकाम आणि दुरुस्तीला परवानगी मिळत नाही. शनिवार वाडा परिसरातील अनेक मिळकतींना देखील याचा फटका बसत आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याशी देखील चर्चा झाली असून त्यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा केला जात आहे. आता या परिसरातील हजारो नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील देवेंद्रजींना विनंती केली. यावेळी ‘एएमएएसआर’ कायद्यात सुधारणा करण्याचे राज्यसभेत प्रलंबित असणारे विधेयक संमत होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा शब्द त्यांनी दिला. (Pune News)

कसबा मतदारसंघात असणाऱ्या विविध विकासकामांवर देखील यावेळी चर्चा झाली असून राज्य शासनाच्या माध्यमातून निधी देण्याची मागणी देवेंद्रजींकडे केली. या मागण्यांना देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कसबा विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांच्या संदर्भात आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी युडीसीपीआर कायदा व शनिवार वाडा परिसरातील बांधकामांना परवानगी मिळावी यावर सविस्तर चर्चा झाली.
पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाचे असणारे हे प्रश्न निश्चितच सोडवले जातील हा शब्द त्यांनी दिला.
याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी देखील चर्चा झाली असून त्यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा केला
जात आहे. ते सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करत असून त्यांची सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी
आग्रही भूमिका आहे.

  • हेमंत रासने
    (कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी स्थायी समिती अध्यक्ष)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Research on Social Media | मेंदूवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह प्रभाव पडतो की नाही? लेटेस्ट रिसर्चचा दावा आश्चर्यचकित करेल तुम्हाला

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला, केसगळतीला लागेल ब्रेक