Pune News : कोंढव्यात पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार करून खुनाचा प्रयत्न, पोलिसांकडून आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिवाळीत झालेल्या भांडणावरुन सहा जणांनी तरुणावर पालघनने वार करुन त्याला जबर जखमी केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सहा जणांसह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भैय्या, अजय निकाळजे, दीपक गायकवाड, नितीन निकाळजे, अक्षय कांबळे, अभिजित कांबळे व इतर चार साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साईराज राणाप्रताप लोणकर (वय २१, रा. कोंढवा खुर्द) याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना शिवसेनेचे माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांच्या कार्यालय समोरील रविवारी दुपारी सव्वाचार वाजता घडली.

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलिसनामाला सांगितले की, फिर्यादी आणि नितीन निकाळजे यांच्या गाडी पार्क करण्यावरुन १३ नोव्हेंबर रोजी वाद झाला होता. तेव्हा लोणकर याने निकाळजेवर कोयत्याने वार केला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी लोणकर याला अटक केली होती. काही दिवसांनी तो जामीनावर सुटला होता. याप्रकारापासून आरोपी हे बदला घेण्याची संधी शोधत होते. रविवारी दुपारी सव्वाचार वाजता फिर्यादी हा माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांच्या कार्यालय जवळ थांबला असल्याची माहिती आरोपींना मिळाली. भैय्या, अजय निकाळजे, दीपक गायकवाड, नितीन निकाळजे, अक्षय कांबळे, अभिजित कांबळे व इतर चार साथीदार हे तेथे गेले. भैय्या याने लोणकर याच्या डोक्यात पालगनने वार केले. अजय निकाळजे याने ही त्यांच्याकडील पालगनने लोणकर याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी याने तो त्याच्या हातावर झेलला.

अजय निकाळजे याने पालघन हवेत फिरवत मी इथला भाई आहे, तुला कोण वाचवितो ते बघतोच, असे म्हणून जोरजोरात ओरडून दहशत पसरविली. त्यानंतर आरोपी पळून गेले. लोणकर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वारामुळे त्याच्या उजव्या तळहातावर जखम होऊन ८ टाके पडले. यादरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक,चेतन मोरे , दादाराजे पवार, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे , नितीन शिंदे, निलेश चव्हाण, यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली कोंढवा पोलिसांनी शिताफीने आरोपी अटक केली .