Pune News : धानोरी परिसरातील MSEB ऑफिसमधील असिस्टंट इंजिनिअरला 4 हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनने रंगेहात पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धानोरी परिसरातील एमएसईबी ऑफिसमधील अभियंत्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू आहे. दीपक गोंधळेकर असे पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

लोकसेवक दीपक हा धानोरी ब्रँच येथे असिस्टंट इंजिनिअर आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांचे एमएसईबीत काम होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. हे काम असिस्टंट इंजिनिअर असलेले दीपक यांच्याकडे होता. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने खात्री करत पडताळणी केली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. या नुसार आज एसीबीच्या सापळा कारवाईत 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.