Pune News | व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी भारती विद्यापीठ आयएमईडीमध्ये इंडक्शन प्रोग्रॅम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | भारती विद्यापीठच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट (Bharati Vidyapeeth’s Institute Of Management) अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ च्या एमबीए, एमसीए अभ्यासक्रमाच्या २०२१ या शैक्षणिक वर्षाच्या नव्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम २६ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत हा 10 दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम चालणार असून या विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची ओळख करून देण्यात येणार आहे, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे समजावून सांगितली जाणार आहेत, तसेच समुपदेशन केले जाणार आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्स द्वारे हा इंडक्शन प्रोग्रॅम (Induction Programme for MBA,MCA Students) ऑनलाईन होत आहे.

‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक तसेच भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर, एमसीए अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. अजित मोरे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. 10 दिवसीय इंडक्शन प्रोग्रॅम मधून डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ पवन अगरवाल (मुंबई), आनंद मोटे, जयंत ओक, अनुपमा जवळगी, आसावरी भावसार, संगीता शरद, वृंदा वाळिंबे, रिंकू नागपाल, निरंजन सिंग हे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

डॉ. अजित मोरे, प्रसाद देशपांडे (झेन्सार टेक्नाँलॉजी),
मंदार भिंगारकर (पर्सिस्टंट टेक्नाँलॉजी), धनंजय गोखले,
संजीव सोमणी, गीतिका पालिवाल, संगीता शरद,
देविका थोरात हे एमसीए अभ्यासक्रमाला मार्गदर्शन करणार आहेत.
एमबीए, एमसीए या अभ्यासक्रमांचे २५० विद्यार्थी उपस्थित राहणार आहे.
हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे.

Web Title :-  Pune News | Bharati Vidyapeeth’s Institute Of Management, Induction Programme for MBA,MCA Students

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Trending News | तुम्ही पाहिलाय का असा पोपट जो स्वत: उघतो डस्टबिनचे झाकण? वायरल व्हिडिओमध्ये पाहा हैराण करणारे दृश्य (Video)

Benefits of Guava | ताकद वाढवण्यासाठी खा पेरू, ‘या’ आजारांवर खुपच लाभदायक, जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

Barshi News | बार्शी ही गुणवत्तेची खाण ! चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख यांचे गौरवोद्गार