Pune News : सराफा दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सराफी दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden police)  अटक केली. त्यांच्याकडून कोयते, मिरचीपूड, शस्त्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई काल मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास साधू वासवानी चौक परिसरात करण्यात आली.

सूरज रवींद्र बोरूडे (वय २१), सोनू राजेश साळुंके (वय २०), गणेश बबन ठोंबरे (वय २३), बळीराम सुदाम पतंगे (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई गौरव उभे यांनी फिर्याद दिली आहे.

वाढत्या गुन्हेगाराला लगाम घालण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बंडगार्डन पोलीस काल मध्यरात्री हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी साधू वासवानी चौकातील गोल्डमार्ट ज्वेलर्स दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाउन पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोयते, मिरचीपूड, शस्त्रे मिळून आली. ज्वेलर्सवर दरोडा टाकणार असल्याची कबुली आरोपींनी दिली.