Pune News : हडपसर, कर्वेनगरसह शहरात 4 ठिकाणी घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, आज चार ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडत लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे.

याप्रकरणी ऍन्थेनी सनी फर्नांडिस (वय 61) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी हे
रविवारी सकाळी कुटुंबासह प्रार्थनेसाठी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी दरवाजाच्या कड्या उचकटून आत प्रवेश केला. घरातील ५५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास परत घरी आले. त्यावेळी त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले.

तर दुसरी घटना कर्वे रस्त्यावर घडली असून, येथील

पानटपरीच चोरट्यांनी फोडली आहे. चोरट्यांनी 5 हजार रूपयांची रोकड व 5 हजार रूपयांचे साहित्य असा 11 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आकाश दिलीप पाटील (वय २५, रा. हिंगणे होम कॉलनी,कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच हडपसर भागात एक मोबाईल शॉपी फोडली आहे. याप्रकरणी दीपक मोहनलाल गंगावणी( रा. फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे हडपसर परिसरातील गाडीतळ येथे मोबाईलचे दुकान आहे, या ठिकाणाहून चोरट्यांनी रोख रक्कम व मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यासोबतच विश्रांतवाडी येथील पराग कोहाड (वय ४६) हे सुट्टीनिमित्त नागपूरला गावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून १० हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी गावावरून परत आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.