Pune News | ‘प्रथिनांना जोड हवी कर्बोदकांची’ – सुप्रसिद्ध आहारतज्ञ अवंती दामले

पुणे: Pune News | स्नायूवर्धनासाठी प्रथिने आवश्यक असतात हे आपण जाणतोच. पण, त्या प्रथिनांचे शरीरात योग्य प्रकारे शोषण होण्यासाठी त्यांना कर्बोदकांची (Carbohydrates) जोड देणे आवश्यक असते. यासाठी आपल्या पारंपरिक आहारातील जोड्या उत्तम आहेत. जसे वरण / आमटी – भात, उसळ – पोळी / फुलका, इडली – सांबर इत्यादी असे मत सुप्रसिध्द आहार तज्ञ अवंती दामले (Avanti Damle) यांनी मांडले.

जागतिक महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने आयोजित ‘अन्नपूर्णेचे आरोग्य’ या महिलांच्या स्वास्थसंबंधी सत्रामध्ये त्या बोलत होत्या. योगेश शांडिल्य-तिवारी (Yogesh Shandilya-Tiwari ) यांनी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन नारायण पेठेतील (Narayan Peth Pune) लोकमान्य सभागृह येथे या सत्राचे आयोजन केले होते.

आहाराबात महिलांनी जागृक असणं हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि एकूणच आरोग्य संपन्न समाजासाठी आवश्यक आहे असंही त्या म्हणाल्या. पूर्वी पाटा वरवंटा, कपडे धूणे व हाताने पिळणे, जमीन सारवणे वगैरे क्रियांमूळे महिलांच्या स्नायूंना बळकटी मिळायची. परंतु आजकालच्या जीवनशैलीतून या बाबी हद्दपार झाल्या असल्याने महिलांना आपले स्नायू बळकट ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे अत्यावश्यक असल्याचे दामले म्हणाल्या.

या सत्रामध्ये २०० पेक्षा जास्त महिलांची हिमोग्लोबीन तपासणी देखील केली गेली. हिमोग्लोबीनची कमतरता असणाऱ्या महिलांना डॉ ज्योती शाळीग्राम (Dr Jyoti Shaligram) यांच्या सल्ल्यानुसार पोषक औषधे देण्यात आली. याप्रसंगी मोनिका मुरलीधर मोहोळ या उपस्थित होत्या. सुनंदा तांदळे, नितीन पोरे, गणेश जाधव, प्रणिता सांखला, निखिल देशपांडे, ओंकार दामले, आरती सुगंधी, आरती भिडे, तृप्ती कान्हेकर आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर असूनही विसंवादी