Pune News । येरवड्यात लवकरच उभारणार CBI कार्यालय

पुणे (Pune) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News । पुण्यातील येरवडा (Yerawada in Pune) येथे केंद्रीय स्तरावरील केंद्रीय अन्वेषण विभागाचे central bureau of investigation सीबीआय (CBI) भव्य कार्यालय लवकरच उभारले जाणार आहे. तेथील फुलेनगर रस्त्यावरील उभारल्या जाणाऱ्या जागेमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाचे central bureau of investigation (CBI) कार्यालय आणि अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र वसाहत निर्माण होणार आहे. पुण्याच्या येरवडा (Yerawada in Pune) येथे ‘सीबीआय’चे कार्यालय (CBI Office) निर्माण होणार असल्यानं येरवडा कारागृहाचे (Yerwada Prison) देखील महत्त्व वाढणार आहे (Pune News).

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 2,000 रुपये; येथे चेक करा यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही

नव्याने तयार होणाऱ्या ‘केंद्रीय अन्वेषण विभागाच्या central bureau of investigation (CBI) जागेमध्ये पुणे जिल्ह्याचे (Pune) भव्य तीन मजली कार्यालय उभारलं जाणार आहे. तसेच त्यालगत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी 4 इमारतींची वसाहत बांधली जाणार आहे. या कामासाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, येत्या दीड वर्षांमध्ये कार्यालय आणि इमारत वसाहतीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि CBI अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (30 जून) रोजी नवीन होणाऱ्या भव्य कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी पुणे ‘CBI चे शाखाप्रमुख मच्छिंद्र कडोळे (Machhindra Kadole) आणि बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता उदय चौगुले (Uday Chowgule) आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

फुलेनगर-आळंदी रस्त्यावर (Phulenagar-Alandi road) मनोरुग्णालयाच्या मोकळ्या
मैदानाशेजारी ‘CBI ची एक एकरहून अधिक जागा आरक्षित होती. मागील अनेक वर्षांपासून जागा
मोकळी होती. निवडक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले.
तर, पुणे ‘CBI चे कार्यालयीन कामकाज सध्या पिंपरीतील (Pimpri) आकुर्डी (Akurdi)
भागातील कार्यालयात आहे. या दरम्यान, येरवड्यातील नवीन इमारताचे काम पूर्ण झाल्यावर
आकुर्डीचे कार्यालय (cbi akurdi pune) येरवड्यात स्थलांतर केलं जाणार असल्याचं CBI च्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

 
ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | central bureau of investigation (cbi) office to be set up in yerwada

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update