Pune News | लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची पुणे अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | लिफ्टमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाची पुणे अग्निशमन दलाकडून (Pune Fire Brigade) सुखरुप सुटका करण्यात आली. भवानी पेठे, गुरुनानक नगर, अर्बन सॉलिटियर येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक सात वर्षाचा मुलगा अडकला होता. (Pune News)

याबाबत मुलाच्या कुटुंबियांनी शनिवारी (दि.23) रात्री 09.05 वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात संपर्क करुन इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने मुलगा अडकल्याची माहिती दिली. अग्निशमन मुख्यालयातून तातडीने फायर गाडी व रेस्क्यु व्हॅन रवाना करण्यात आली. 10 मिनिटात जवान घटनास्थळी दाखल झाले.

जवानांनी पाहिले की, एक लहान मुलगा (वय वर्ष 7) सहा मजली असणाऱ्या इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट बंद झाल्याने अडकला आहे. जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवला. जवानांनी लिफ्ट रुममधे जाऊन तांत्रिक रित्या कार्य पार पाडत लिफ्ट पहिल्या मजल्यावर समांतर घेतली. तसेच दलाकडील स्प्रेडरचा वापर करुन लिफ्टचा दरवाजा उघडत लहान मुलाची सुमारे वीस मिनिटात सुखरुप सुटका केली. (Pune News)

सुखरुप सुटका होताच तेथील रहिवाशांनी जवानांचे आभार मानले. या कामगिरीत अग्निशमन नियंत्रण कक्ष
अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक अतुल मोहिते, प्रशांत मखरे, तांडेल मंगेश मिळवणे व फायरमन चंद्रकांत गावडे,
सुधीर नवले, ओंकार बोंबले, अमर दिघे, केतन नरके यांनी सहभाग घेतला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज