क्राईम स्टोरीपुणे

Pune News | खून का बदला खून ! ‘व्हॉट्सॲप’ स्टेटस ठेवून खून्नस दिल्याने केला निर्घृण ‘मर्डर’; भाच्याच्या खुनाचा बदला मामानं घेतला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गुन्हेगार (Criminal) ‘बदला’ कसा घेतात याची ‘झलक’ पुणे पोलीस (Pune Police) व पुणेकरांना पर्वतीत घडलेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलाच्या खुनाने (Murder in Pune) दिसून आली असून, पैलवानाला मारला अगदी तशीच हत्या या मुलाची करण्यात आली आहे. त्याचा एका हाताचा पंजा (Hand claw) कापून काही अंतर टाकण्यात आला होता; तर डोक्याचा (head) ‘भुगा’ केला आहे. त्यातही हा खून (Murder) बाल सुधार गृहातून (juvenile home) बाहेर आल्यानंतर “व्हाट्सॲप” स्टेटस (WhatsApp status) ठेवत सतत खुन्न दिल्याने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या खुनाने मात्र दत्तवाडीतील (Dattawadi) पूर्वी घडलेल्या खुनाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलिसांनी (Dattawadi Police) याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे तर, तिघांना अटक (Arrest) केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून
पुणे शहरातील पर्वती पायथा (parvati paytha pune) परिसरात रविवारी रात्री सौरभ वाघमारे Saurabh Waghmare (वय 17) या तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील सहा आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी अटक (Dattawadi police arrest accused) केली आहे. भाच्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी यातील एका आरोपीने या तरुणाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आकाश नावाडे, वृषभ दत्तात्रय रेणुसे आणि सचिन उर्फ दादा पवार अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. तर अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी दादासो बनसोडे (वय 23) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (FIR) दिली आहे.

भाच्याच्या खूनाचा बदला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव पठार (ambegaon pathar) भागात एप्रिल महिन्यात पैलवान संग्राम लेकावळे Wrestler Sangram Lekavale याचा खून झाला होता. यात तीन मुलांना अटक केली होती. तर सौरभ वाघमारे याच्यासह चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) गुन्हा (FIR) दाखल आहे. त्यावेळी पोलिसांनी सर्वांना पकडले होते. तिघांची रवानगी कारागृहात (Prison) झाली होती. तर सौरभ व इतरांची बालसुधारगृहात झाली होती. यात एकच महिन्यात सौरभ आणि इतर अल्पवयीन असलेल्या चौघांची सुटका झाली होती.

व्हाट्सॲप स्टेटस ठेवत खुन्नस
दरम्यान बाहेर आल्यानंतर सौरभ हा सतत व्हाट्सअपला खुन्नस देणारे स्टेटस ठेवत असे.
त्यातून वाद आणखीनच पेटला गेला. त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग (Planning) केले.
यानंतर काल रात्री त्याचा मोबाईल घेऊन जनता वसाहतमधील (janta vasahat) दोघेजण पर्वती पायथा येथे गेले.
त्यांनी सौरभ याला येथे बोलावून घेतले. तो मोबाईल घेण्यासाठी म्हणून त्याठिकाणी गेला.
मात्र तो दिसताच आरोपींनी थेट शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात सपासप वार करून त्याचा खून केला.
ज्या प्रमाणे पैलवान संग्रामचा खून झाला होता, आगदी त्याच पद्धतीने त्याचा निर्घृण खून केला.
तर त्याचा एका हात मनगठापासून वेगळा करून तो बाहेर काढला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी चोवीस तासात 6 जणांना पकडले आहे.
अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

Web Title : Pune News dattawadi police arrest 6 criminal in murder case of minor

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन रुग्ण, 713 जणांना डिस्चार्ज

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक

Back to top button