Pune News | 24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप; संबंधितांवर कारवाई करण्याची भाजपचे संदीप खर्डेकर यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे मेट्रो, 24X7 पाणी पुरवठा योजना (24X7 Water Supply Scheme) अशा विविध विकासकामांसाठी पुण्यात खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे. याबाबत सर्व स्तरावर तक्रारी करुन देखील कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे आदेश असताना अद्याप खड्डे बुजवण्यात (Pune News) आलेले नाही. त्यामुळे खड्डे न बुजवणाऱ्या संबंधितांवर प्रशासनाने कारवाई (Action) करावी यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश (BJP Maharashtra Pradesh), प्रवक्ता संदीप खर्डेकर (spokesperson Sandeep Khardekar) यांनी पुणे महानगर पालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Addl Commissioner Vikas Dhakne) यांना निवेदन दिले आहे.

संदीप खर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, 24×7, पुणे मेट्रो (Pune Metro) यासह विविध विकासकामांसाठी (Development Works) केलेल्या खोदाई नंतर पुण्यातील अनेक रस्त्यांची शब्दश: चाळण झाली असून ह्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांची हाडं आणि वाहने सुद्धा खिळाखिळी झाली आहेत. विशेष म्हणजे सर्व स्तरावर तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे च आहे. काल आपण त्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश देतानाच खड्डे ना बुजविल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा ही इशारा दिला आहे. प्रशासनाकडून काहीतरी होईल अशी थोडी आशा वाटली म्हणून हा पत्र प्रपंच. (Pune News)

अलंकार पोलीस स्टेशन (Alankar Police Station) जवळील शैलेश पूल, पुढे समर्थ पथावरील शक्ती 98 चौक, गिरीजाशंकर विहार कडे जाणारा रस्ता, k52 समोरील तसेच सहवास सोसायटी कडे जाणारा रस्ता, नळस्टॉप चौकातील गल्लीत टेलिफोन एक्सचेंज मागील रस्ता अश्या अनेक ठिकाणी रस्ते खचले असून चिखलाचे साम्राज्य झाले आहे.यावरून दुचाकी घसरून पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तर अनेकांना पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्याचा अंदाज ना आल्याने गाडी उडून कंबर, मान आणि मणक्याला मार बसला आहे.

24×7 पाणीपुरवठा योजना शहरासाठी महत्वाची असली तरी सदर काम करणाऱ्या कंपनी कडून रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यावी.
यामुळे 24×7 म्हणजे पुणेकरांसाठी विकतचे दुखणे झाले आहे.
मनपाच्या पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, महावितरण च्या विद्युत लाईन, खासगी कंपन्याची केबल साठीची खोदाई
ह्या सगळ्या कामानंतर रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत आणि त्याचा मोठा फटका पुणेकरांना बसत आहे.
खड्डे बुजविताना डांबर योग्य तपमानाचे नसल्याने लगेचच खडी रस्त्यावर पसरते आणि खड्डा परवडला पण
अशास्त्रीय पद्धतीने बुजविणे नको असे सर्वांचेच मत झाले आहे.
तरी आपण युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून पुणेकरांना दिलासा द्यावा. अजून पुण्यात मोठा पाऊस झालेला नाही.
त्यानंतर काय स्थिती होईल याची कल्पनाच करवत नाही. आपण योग्य कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे,
असे संदीप खर्डेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘ओळख लपवून मुलींशी लग्न अन् धर्मांतर…’, लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया (व्हिडीओ)

Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूने घेतले अभिनेत्याकडून उपचारासाठी पैसे? सोशल मीडियावर दिले उत्तर