Pune News : मध्यरात्रीपर्यंत सुरु होते रेस्टाॅरंट; हॉटेलचालक, वेटरासह ग्राहकांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोराेना संसर्ग वाढत असल्याने शहरात रात्री संचारबंदी लागू केली आहे. हॉटेल, रेस्ट्रारंटला रात्री ११ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. असे असताना अनेक हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी आता हॉटेलचालकाबरोबरच उशिरापर्यंत हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या ग्राहकांवरही गुन्हा दाखल करण्यात सुरुवात केली आहे.

कोंढव्यात मध्यरात्रीपर्यंत सुरु असलेल्या बेहेस्त रेस्टॉरंटवर कोंढवा पोलिसांनी कारवाई करुन हॉटेलचालकासह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात ४ ग्राहकांचा समावेश आहे.

जाहेद अली सज्जाद अली शेख (वय २९, रा. गुरुवार पेठ) असे हॉटेलचालकाचे नाव आहे. ग्राहकांना जेवण वाढणाऱ्या ७ वेटरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एन आय बी एम रोडवर बेहेस्त रेस्टॉरंट आहे. तेथे मध्यरात्री सव्वाबारा वाजता पोलिसांनी छापा घातला. तेव्हा तेथे ४ ग्राहक जेवण करीत होते. कोरोना विषाणुच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याचे आढळून आल्याने ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सैय्यद , उपनिरीक्षक निकेतन निंभाळकर यांनी केली आहे .