Pune News : कात्रजमध्ये ‘जागरण गोंधळ’ कार्यक्रमात नातेवाईकांचे मद्यपान करून ‘डांगडिंग’, चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कात्रज परिसरात आयोजित “जागरण गोंधळा”च्या कार्यक्रमात मद्यपान करून आलेल्या चार नातेवाईकांनीच “गोंधळ” घातला. कारण होतं, गोंधळात गाणे म्हणू न दिल्याचं. या गोंधळाच पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाल. हा गोंधळ नुसता तुंबळ हाणामारीवर न थांबता त्या चौघांनीनंतर अंधाधुंद दगडफेक करत चांगलाच “गोंधळ” घातला. रात्रभर झालेल्या गोंधळामुळे मात्र परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्या चौघांना अटक केली आहे.

याप्रकरणी सागर सुभाष गवळी (वय 21), सुवन सतीश गवळी (वय 22), सावन सुभाष गवळी (वय 23) आणि पवन सतीश गवळी (वय 25, रा. बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विकास जनार्धन गवळी (वय 44) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हर चालक आहेत. दरम्यान त्यांच्या कात्रज येथील घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. या आयोजित कारेक्रमाला नातेवाईक असलेल्या या चौघांना बोलवण्यात आले होते. हे चौघेही फिर्यादी यांचे पुतणे चुलते असे नातलग लागतात. दरम्यान कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मात्र हे चौघे मद्यपान करून आले. त्यांनी गोंधळाच्या कार्यक्रमाला आम्हाला गाणे म्हणू द्या म्हणून हट्ट धरला.

यावरून वाद झाल्यानंतर मात्र त्या चौघांनी नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येईल अशा पध्दतीने अंधाधुंद दगडफेक करत गोंधळ घातला. तसेच फिर्यादी त्यांची पत्नी व मुलाला मारहाण करत त्यांना जखमी केले आहे. या प्रकारामुळे मात्र परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.