Pune News : कुख्यात गजानन मारणे यांच्यासह 9 जणांना अटक; शरद मोहोळ यांच्यासह 26 जणांविरुद्ध ‘कडक’ FIR; ‘ते’ सर्व ‘गोत्यात’ येणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्का सारख्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर तळोजा कारागृहातुनच ‘रॉयल इंट्री’ मारत पुण्यात दाखल झालेल्या कूख्यात गुन्हेगार गजा उर्फ गजानन मारणेला त्याची Royal Entry चांगलीच महागात पडली असून, पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला आणि त्याच्या ‘विश्वासू’ कार्यकर्त्यांना ‘प्रसाद’ देत अटक केली आहे. तर दुसरीकडे ‘खडक’च्या हद्दीत ‘कडक’ Entry मारणाऱ्या शरद मोहोळसह 26 जणांवर आज अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याच्यासह 9 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोन खून प्रकरणात मोक्काच्या गुन्ह्यातून न्यायालयाने मुक्तता केल्यानंतर गजनान मारणे याची काल (सोमवार) तळोजा कारागृहातून सुटका झाली. पण ही सुटका आणि त्यानंतर झालेली त्याची रॉयल Entry चांगलीच महागत पडली आहे. शेकडो गाड्यांचा ताफा आणि चाहत्यांची गर्दी त्यानंतर महामार्गावर झालेला रोड शो यामुळे पुण्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या चाहत्यांनी तर ‘किंग’ महाराष्ट्राचा असे स्टेटस टाकत ‘डॉन’ आला तुमच्या सर्वांचा ‘बाप आला’ असे डायलॉग असणारे स्टेटस टाकले होते. बर त्याच्या या रॉयल इंट्रीचे व्हिडीओ इतके व्हायरल झाले की यातून पोलिसांना कळलं. शेकडो गाड्या, त्यासोबतच शेकडो तरुण आणि त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. रस्त्याच्या मध्येच त्याचे गुलाब पुष्प असणारे भले मोठे हार घालून झालेले स्वागत आणि बरच काही घडलं.

पण आता हीच रॉयल Entry गजा मारणे आणि त्याच्या साथीदार व सर्मथक यांना महागत पडणार आहे. कारण पुणे पोलिसांनी या सर्वांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गजा मारणे, त्याचे साथीदार व समर्थक आशा सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस या सर्वांना पकडणार आहे. दरम्यान, यात गजा मारणे आणि त्याच्या 9 साथीदारांना पकडले आहे.

‘त्या’ गाड्यांचा पोलीस शोध घेणार !
गजा मारणे याचा ताफ्यात शेकडो वाहने आणि तरुण होते. पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला. पण या ताफ्यात समावेश असणाऱ्या वाहनांची माहिती घेऊन त्यावर देखील कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही वाहने कोणाची आहेत, हेही समजेल तर कोरोना सारख्या महामारीत एकीकडे सर्व गोष्टींवर निर्बंध असताना ही रॅली झाली कशी.

तळोजा कारागृहातुनच चारचाकीत बॉडी गार्डसह Entry
गजा मारणे हा तळोजा कारागृहात होता. त्याची सुटका झाली. यानंतर तळोजा कारागृहाच्या आतच त्याला घेण्यास कार आत नेली गेली. तर त्यात बाऊन्सर आणि चाहत्यांची मांदियाळी होती. त्यामुळे मारणेला कारागृहात जाऊन आणण्यात आले. त्याची तिथूनच मिरवणूक काढली गेली किंवा सुरुवात झाली. मग कारागृह प्रशासन काय करत होत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गजा मारणेसह त्याच्यासोबत असणाऱ्यांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मारणेसह काही जणांस अटक केली आहे. शहरात अशा घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या सुरक्षेबाबत पुणे पोलिस कटिबद्ध आहेत. पुणेकरांना सुरक्षित वातावरण मिळेल. तर कायदा व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करू.
– डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त,

तळोजा येथील प्रकाराची चौकशी
तळोजा कारागृहातून गॅगस्टर गजा मारणे सुटल्यानंटर तो कारागृहाच्या एका प्रवेशद्वारातून मोटारीतून बाहेर येत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तसेच, त्या मोटारीत अनेकजण बसल्याचे दिसत आहे. गेटजवळ मोठी गर्दी जमा झाली होती. या सर्व प्रकाराची कारागृहाच्या दक्षिण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कारागृहाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी दिली.

शरद मोहोळवर गुन्हा दाखल
खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात बेकायदा जमाव गोळा करणे व इतर कायद्यानुसार गॅगस्टर शरद मोहोळ याच्यासह दहा ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मिडीयावरून व्हायरल झाले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.