Pune News | दुर्ग रायगडाचा इतिहास उलगडला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या रायगडावरील विविध घटना, प्रसंगांचा इतिहास कथन करतानाच गडाचे दरवाजे, गडावरील वाडे, बुरुज, बाजारपेठ, सदर, राजवाडा, राजसभा, नगारखाना, मनोरे या वास्तूंचे महत्त्व काय, त्यांची निर्मिती कशी झाली, त्यांचे वैशिष्ट्य काय, याचे दर्शन प्रभावीरीतीने घडवण्यात आले आणि रायगडाचा सारा इतिहासच श्रोत्यांसमोर उलगडला. (Pune News)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत ‘असा होता रायगड’ या विषयावरील पहिले पुष्प डॉ. रमा लोहोकरे यांनी गुंफले. डॉ. लोहोकरे यांनी यावेळी दुर्ग रायगडाची करून दिलेली ओळख श्रोत्यांना भावली. अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम यांनी या व्याख्यानमालेचे आय़ोजन केले आहे. उद्घाटन कार्यक्रमात शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांची प्रमुख उपस्थिती होती. (Pune News)

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात इतिहासाचे अभ्यासक प्रसाद तारे यांनी ‘असा झाला राज्याभिषेक’ या विषयावर सादरीकरण केले. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू त्यांनी उलगडून दाखवले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांना माहिती होण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी जे काम केले त्याला तोड नाही. ते एक आदर्श स्वयंसेवक होते, असे अ‍ॅड. जैन यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. प्रभू श्रीरामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आता युवक-युवतींना माहिती करून देणे आवश्यक आहे, असे डॉ. दबडघाव म्हणाले.

संस्थेचे अध्यक्ष सुनील राऊत यांनी प्रास्ताविक, विश्वस्त राजाभाऊ पानगावे यांनी संयोजन आणि नागेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News | दुर्देवी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाली; 4 मुलींचा समावेश

घरात घुसून तलवारीने वार, आकुर्डी परिसरातील घटना; दोघांना अटक

Lingayat Community News | होय, आम्ही बसव तत्व स्वीकारलयं ! लिंगायत युवा पिढीची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल

Talwade Fire Case | ‘स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा, एकाला अटक

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त