Pune News | जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’ विरूध्दच्या मोहिमेत योगदान देणाऱ्यांचा धनकवडीत ‘सन्मान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | कोरोनाच्या (Corona) संकटाशी दोन हात करताना देशात 100 कोटी लसीकरणाचा (Vaccination) टप्पा पार झाला. त्यात पुण्यातील (Pune News) धनकवडी (Dhankawadi) उपनगराने अभिमानस्पद कामगिरी करीत 31 हजार नागरिकांचे लसीकरण केले. त्या पार्श्वभूमीवर या मोहिमेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मोहिमेत योगदान देणाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

धनकवडी येथील आरोग्यदुतांना चिंतामणी ज्ञानपीठ (chintamani dnyanpeeth) आणि श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेच्या वतीने विशेष सन्मान सोहळा घेण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अशोक संचेती (Dr. Ashok Sancheti) आणि डॉ. संभाजी मांगडे (Dr. Sambhaji Mangade) या मान्यवरांच्या हस्ते या आरोग्यदुतांना सन्मानित करण्यात आले.

 

कोरोनाच्या अतिशय अवघड काळात या आरोग्य दुतांनी समाजासाठी केलेली कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार डॉ. संचेती यांनी काढले. याप्रसंगी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे (Dattatraya Dhanakwade), नगरसेवक विशाल तांबे (Corporator Vishal Tambe), नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे (Corporator Balabhau Dhanakwade), सागर भागवत, श्रद्धा परांडे, नाना जगताप, युवराज रेणुसे, सचिन डिंबळे, विलासराव भणगे, बापू शिळीमकर हे उपस्थित (Pune News) होते.

 

Web Title : Pune News | Honor to those who contributed to the campaign against Corona regardless of their lives

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Latur District Bank Election | भाजपला धक्का ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

Mutual Fund | ‘या’ फंडने दिला 64.8% चा शानदार रिटर्न ! 10 हजाराची गुंतवणूक झाली 1.57 कोटी रुपयांची, जाणून घ्या सविस्तर

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 126 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी