Pune News | मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीच्या पुणे दौर्‍यात आजवरचा सर्वात मोठा बंदोबस्त

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | मराठा नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयरे बाबत आग्रही भूमिका कायम ठेवली आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, यासाठी सकल मराठी समाजाकडून निदर्शने, रास्ता रोको आंदोलने तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार यांच्या (Ajit Pawar) आजच्या पुणे दौर्‍यात रस्ता रोको (Rasta Roko) आंदोलन होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या दौर्‍यासाठी मुख्यमंत्र्यांसाठीचा आजवरच सर्वात मोठ्या बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. (Maratha Reservation Andolan)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहिल्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने वढू येथील गायकवाड मैदानावर तयार केलेल्या हेलिपॅडवर उतरणार आहेत. तेथून ते वढु बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर मोटारीने तुळापूर येथील संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तेथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरवरुन पुणे विमानतळाकडे रवाना होतील.(Pune News)

ADV

विमानतळावरुन संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तेथून ते पुन्हा पुणे विमानतळाकडे रवाना होतील. असा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम आहे.

या सर्व ठिकाणी व मार्गावर कोठेही आंदोलन अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त
ठेवण्यात आला आहे. संपूर्ण तुळापूर येथील बंदोबस्ताची देखरेख अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil)
यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पुण्यातील विमानतळ ते संगमवाडी येथील बंदोबस्ताचे देखरेख अधिकारी म्हणून
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस उपायुक्तांकडे बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे.
व्हीआयपीच्या कॉन्व्हॉयमध्ये इतर कोणतेही वाहन प्रवेश करणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
विमानतळ व तुळापूर येथे स्वतंत्र दोन निदर्शने विरोधी पथके नेमण्यात आली आहेत.
तसेच कॉन्व्हायच्या पुढे निदर्शने विरोधी पथक राहणार आहेत. कोणी आंदोलन अथवा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला
तर त्यांना तातडीने ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. त्यासाठी या पथकाला ३ मोठ्या ५ टनी गाड्या पुरविण्यात आल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shikhar Bank Scam Case | अजितदादा सत्तेत इन, तपास आऊट, शिखर बँक घोटाळ्याचा तपास बंद करा; पोलिसांची कोर्टाला विनंती

Dabholkar Murder Case | डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सनातन’च्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचे महत्वाचे वक्तव्य, ”आम्हाला अडकवण्याचा…”

Pune Mundhwa Police | दुचाकीस्वाराला भररस्त्यात मारहाण करुन लुटले, दोघांना मुंढवा पोलिसांकडून अटक

BJP-Shivsena Seat Sharing In Lok Sabha Elections | जागावाटपावरून महायुतीत तणाव, शिंदे गटाचा संताप, सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय?

Pune Lonavala Mega Block | पुणे – लोणावळा लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या रद्द झालेल्या गाड्यांची यादी