Pune News : इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर त्यानं तिच्याकडून 1 लाख अन् अंगठी घेऊन केली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून 1 लाख रुपये आणि दीड तोळ्यांची अंगठी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा नुकताच वाढदिवस झाला आहे.

याप्रकरणी ओम अविनाश गाडे (वय 19) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विनयभंग, पॉक्सोसह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडिती तरुणीचे इन्स्ट्राग्रामवर खाते आहे. त्यामाध्यमातून आरोपीची एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती. यानंतर दोघे व्हाट्सअपवर बोलत होते. तर एकमेकांना भेटले. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली. यावेळी तरुणाने पिडीत मुलीचा विश्वास संपादन केला. तसेच, मला पैश्यांची अत्यंत गरज आहे, अशी बतावणी केली. तरुणीने मित्राला गरज असल्याने 1 लाख रुपये अन हातातील दीड तोळ्यांची अंगठी असे 1 लाख 60 हजार रुपये दिले. पण नंतर पैसे दिले नाही. यानंतर त्याने तरुणीला माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्याला नकार दिल्यानंतर तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तरुणीने कुटुंबाला हा प्रकार सांगितला. मग तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तरुणाचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत. दरम्यान या तरुणावर स्वारगेट पोलीस ठाण्यात देखील एक अश्याच प्रकार गुन्हा दाखल आहे.