Pune News | ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ गरजूंसाठी पुण्यात आगळावेगळा उपक्रम

प्रल्हाद गवळी मित्र परिवारचा पुढाकार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात

पुणे : Pune News | सध्या सगळीकडे सुंदर रंगानी सजवलेले, विविध आकाराच्या गणपती बाप्पांच्या मोहात पाडणाऱ्या मूर्ती दिसत आहेत. पण या मूर्तींची किंमत अनेकांना परवडणारी नसते. लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पांची मूर्ती हवी. या गोष्टींचा विचार करीत पुण्यातील प्रल्हाद गवळी मित्र परिवार (Pralhad Gavli Mitra Pariwar) तर्फे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. (Pune News)

मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठेत (Raviwar Peth Pune) हा उपक्रम राबविला आहे. उपक्रमाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते गणरायाची आरती करून झाली. त्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच नागरिकांना गणेश मूर्ती देण्यात आल्या. (Pune News)

यंदा ७ हजार ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती असून नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायची आहे. साईनाथ चकोर, हेमंत कंठाळे, नरेश देवकर, जीवन गायकवाड, विक्रम लगड, गौरव गवळी, भाई कात्रे, श्रीराज पवार, विकास गवळी यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

प्रल्हाद गवळी म्हणाले, कोविड काळापासून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हल्ली गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. अनेक कुटुंबांना या मोठ्या मूर्ती घेणे शक्य होत नाही, पण मोठ्या मूर्ती घेण्याचा मुलांचा हट्ट असतो. यामुळे मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कोणाकडे पैसे नसतील तर विनामूल्य मूर्ती देखील देण्यात येते.

लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळेच्या १०१ विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांचे
लाईव्ह चित्र यावेळी काढले. यावेळी आदिमाया ढोल ताशा पथक
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या पथकाने वादन केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘भावी मुख्यमंत्री’ उल्लेखाबद्दल अजित पवार म्हणाले – “त्यासाठी जादूयी… “

Pune Vadgaon Sheri News | मौजे वडगाव शेरी गावातील गेले 15 वर्ष बंद असलेले सातबारे (7/12) पुन्हा चालू होणार;
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रशासनाला निर्देश