Ajit Pawar | ‘भावी मुख्यमंत्री’ उल्लेखाबद्दल अजित पवार म्हणाले – “त्यासाठी जादूयी… “

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रावादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे ‘मुख्यमंत्री’ (CM Of Maharashtra) व्हावेत अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. अनेकदा त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅंनर्स राज्यभर लागलेले दिसून येतात. आज अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असून शहरामध्ये मोठ मोठे बॅनर्स झळकत आहेत. यामध्ये लक्षवेधी ठरत आहे तो अजित पवारांचा उल्लेख. शहरामध्ये लावण्यात आलेल्या अनेक बॅनर्सवर अजित पवार यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. बंडानंतर झालेल्या सभेमध्ये देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आता बॅनर्सवर झळकणाऱ्या या उल्लेखाबद्दल अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी बॅनर्सवर त्यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला जात असल्यावर मत व्यक्त केले आहे. अजित पवार म्हणाले की, “अलिकडे आपल्या महाराष्ट्रात एक नवीन फॅड निघालं आहे. अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असे बॅनर लावत असतात. माझ्या कानावर आलंय की, माझेही असे मुख्यमंत्रीपदाबाबत बॅनर लागले आहेत. राज्यात काही ठिकाणी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) बॅनर लागलेत. काही ठिकाणी पंकजा मुंडेंचेही (Pankaja Munde) बॅनर लागले आहेत.“

“परंतु यामागे कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. या आधी मुंबईमध्ये राष्ट्रवादी भवनाच्या बाहेर माझे, जयंत पाटलांचे (Jayant Patil) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) असे तिघांचे बॅनर लागले. हे काही आम्ही कुणी सांगत नाही.
मी त्यांना नेहमी सांगतो की, असं कुणी बॅनरवर भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री लिहून सांगितल्याने तसं होत नाही.
कुणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर 145 आमदारांचा ‘जादुई आकडा’ गाठावा लागत असतो.”
असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडले आहे.

ते पुढे म्हणाले की, “ज्यांना 145 आमदारांचा पाठिंबा असेल तेच मुख्यमंत्री होत असतात.
या आधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गाठला. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) गाठला,
आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा आकडा गाठला आहे आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले.
असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारात चंदन चोरी