Pune News | सरकारी कामांसाठी राष्ट्रवादी कार्यालय हक्काचे व्यासपीठ – शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय (NCP Office) हे पुणेकरांसाठी (Pune News) एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणेकरांना राज्य सरकारशी (state government) संबंधित कामकाजासाठी निवेदने देणे, पत्रव्यवहार करणे सोयीचे जावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयात तशी सोय करण्यात आली आहे. 9 ऑगस्टपासून सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ही निवेदने स्वीकारण्यासाठी अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक स्वत: पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे, पुणेकरांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय हे केवळ पक्ष कार्यकर्त्यांसाठीच नव्हे, तर पुणेकर नागरिकांसाठीही हक्काचे व्यासपीठ बनावे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली होती. पक्ष कार्यालयाने निश्चितच गेल्या महिना-दीड महिन्यात या अपेक्षेच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. ती यापुढेही कायम राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्य सरकारशी संबंधित कामांसाठी राज्य सरकार व नागरिक यांच्यात एक दुवा म्हणून पक्ष कार्यालय (Party office) कार्यरत राहणार आहे.

यावेळी अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक 9 ऑगस्टपासून दर सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
या वेळी सरकारशी संबंधित कामकाजाबाबतची निवेदने, पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत.
तसेच, सार्वजनिक कामांबाबत (public work) मार्गदर्शनही करणार आहेत.
या उपक्रमाचा निश्चितच पुणेकरांना वेळ आणि श्रमाच्या दृष्टीने फायदा होणार आहे.
तरी, पुणेकर नागरिकांनी राज्य सरकारशी संबंधित सार्वजनिक कामांबाबत या उपक्रमाचा लाभ घ्यावा,
असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president prashant jagtap) यांनी केले आहे.

Web Title :- Pune News | NCP Office Rights Platform for Government Works – City President Prashant Jagtap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,508 नवीन रुग्ण, 4,895 जणांना डिस्चार्ज

Mumbai Local Train | मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! 15 ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा, पण…

New LPG Connection | आता एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल नवीन LPG कनेक्शन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स