Pune News | हडपसरमध्ये 15 ऑक्टोबर रोजी कोकण मेळाव्याचे आयोजन

0
302
Pune News | Organized Konkan fair on 15th October in Hadapsar
File Photo

हडपसर – Pune News | येथील कोकण विकास मंचच्या वतीने 15 ऑक्टोबर रोजी कोकण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील महंमद वाडी रस्त्यावरील विघ्नहर्ता पॅलेसमध्ये संध्याकाळी 5 वाजता आयोजित या मेळाव्यास पोलादपूरचे आमदार आणि मंत्री योगेश गोगावले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Pune News)

 

मेळाव्यामध्ये जीव माझा गुंतला या मालिकेतील अभिनेता आणि कोकणचे सुपुत्र बिपीन सुरेश सुर्वे यांचा सत्कार होणार आहे. यानिमित्ताने कोकणातील पारंपरिक लोकनृत्याचा शक्तीवाले शाहीर – आणि तुरेवाले शाहीर यांच्या कला पथकामध्ये जंगी सामना होणार आहे. (Pune News)

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मारुती तुपे असतील. या कार्यक्रमामध्ये पोलादपूर तालुका रहिवासी संघ, सुजय प्रतिष्ठान, कोकण भूमिपुत्र युवा सामाजिक प्रतिष्ठान, अखिल गांधीनगर कोकण रहिवासी संघ, महाड तालुका रहिवासी संघ, वडगावशेरी कोकण रहिवासी संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोकण विकास मंच, हडपसर चे अध्यक्ष सहदेव महादेव सकपाळ यांनी दिली.

 

Web Title :- Pune News | Organized Konkan fair on 15th October in Hadapsar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा