Pune News | पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच मोबाईल अ‍ॅपवर मिळणार ‘पीएमपी’चे तिकीट, लाइव्ह लोकेशन कळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणेकरांसाठी खुप महत्वाची बातमी असून लवकरच पीएमपीचे तिकिट (PMP Ticket) प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपवर (Mobile App) काढता येणार आहे. तसेच बसचे लाईव्ह लोकेशन देखील समजणार आहे. यासाठीचे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्याच्या प्रयत्नाला यश आले आहे. पेमेंट गेटवेसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाला प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर ही सुविधा सुरू होईल. पुढील आठवड्यात पीएमटी ॲपचा डेमो घेण्यात येणार आहे. (Pune News)

मोबाईल अ‍ॅप वरून तिकीट काढण्याची सेवा मिळावी, अशी अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी होती. आता अ‍ॅपचे काम पूर्ण झाल्याने आणि आवश्यक चाचण्याही देखील झाल्याने लवकरच प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपवरून पीएमपीचे तिकिट काढता येईल. आता केवळ पेमेंट गेट वेच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. ही मंजुरी मिळताच सुविधा सुरू होईल. तसेच अ‍ॅपवरील इतर सुविधांचा लाभ सुद्धा प्रवाशांना घेता येईल अशी माहिती पीएमपी पुणे सह-व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.

पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशनसाठी ‘गुगल’वरील बस थांब्याचे व बस मार्गाचे मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. पीएमपीच्या वाहतूक शाखेच्या विशेष पथकाने मागील सहा महिन्यांपासून यासाठी डेटा गोळा करण्याचे काम केले. एका खासगी संस्थेकडून लॅटिट्यूड (अक्षांश व रेखांश) निश्चित करण्याचे कामही झाले आहे. सुमारे १,५०० बस थांबे व ५८० मार्गांचे मॅपिंग पूर्ण झाले. (Pune News)

पीएमपी दृष्टिक्षेपात

  • एकूण थांबे ४,६७४
  • रोजचे प्रवासी १३ लाख
  • एकूण मार्ग ९८०
  • मॅपिंग झालेले थांबे १,५००
  • मॅपिंग झालेले मार्ग सुमारे ५८०
  • रोजचे उत्पन्न दीड कोटी
  • शेड असलेले थांबे १,२००

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | परदेशात फिरायला पाठवण्याच्या बहाण्याने 15 लाखांची फसवणूक,
पुण्यातील ट्रॅव्हल एजंटवर गुन्हा दाखल

लोन अकाऊंट बंद करण्याच्या बहाण्याने फसवणूक, येरवडा येथील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल